गावपण टिकवण्यासाठी धार्मिक अधिष्ठान महत्वाचे – हर्षवर्धन पाटील.. – बावडा येथे अखंड हरिनाम सप्ताह शुभारंभ…

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी 

                   बावडा गावात पूर्वजांनी अनेक मंदिर बांधली आहेत, या मंदिरांचे सुशोभीकरण आपण सर्वांनी केले. गावचे गावपण टिकून राहावे व सगळ्यांना बरोबर घेऊन विकास करण्यासाठी धार्मिक अधिष्ठान महत्वाचे आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.

          बावडा येथे श्री कामाक्षी पद्मावती मंदिर परिसरात आयोध्येतील श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्ताने अखंड हरीनाम सप्ताह व ग्रंथराज श्री तुकाराम गाथा पारायण सोहळ्याचा शुभारंभ सोमवारी (दि. 22) मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आला. सदर प्रसंगी हर्षवर्धन पाटील बोलत होते. 

          बावडा गावाला ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक परंपरा आहे. सदर परंपरा टिकवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्यरत राहावे. धकाधकीच्या मानवी जीवनात धार्मिक अधिष्ठान चे महत्व वाढत आहे. तसेच धार्मिक कार्यक्रमामुळे गावा-गावातील सामाजिक अधिक मजबूत होत आहे, असे गौरवोद्गार यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी काढले.

          याप्रसंगी गाथा पूजन, विना पूजन, टाळ पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक संतोष सूर्यवंशी यांनी केले. यावेळी विश्वासराव पाटील, प्रतापराव पाटील, अशोकराव घोगरे, उदयसिंह पाटील, अँड. अनिल पाटील, मनोज पाटील, समाजभूषण डॉ. लक्ष्मण आसबे, किरण पाटील, विकास पाटील, अमर पाटील, संतोष पाटील, विजय गायकवाड, हरिभाऊ बागल, सरपंच पल्लवी गिरमे, उपसरपंच रणजीत घोगरे, रणजीत गिरमे, अमोल घोगरे, पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. या सप्ताहामध्ये महिला वर्गाचा सहभाग लक्षणीय आहे. अखंड हरिनाम सप्ताह दि. 29 पर्यंत चालणार आहे.

       चौकट 

    राजवर्धन पाटील यांनी घेतला कीर्तनाचा लाभ !

         या अखंड हरिनाम सप्ताहास निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व इंदापूर तालुका भाजप युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख राजवर्धन पाटील यांनी मंगळवारी दि.23 भेट दिली. यावेळी राजवर्धन पाटील यांनी लाभ घेतला व राज्यातील ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. कन्होबा महाराज देहूकर (पंढरपूर) यांचा सत्कार केला.