पारशिवनी तालुक्यातिल मौजा कोलितमारा येथे राबविण्यात आलेल्या “राजेंद्र मुळक सहायता कक्ष आपल्या दारी”या आरोग्य शिबिराला ग्रामवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

     कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी‌ 

 

   पारशिवनी:- पारशिवनी तालुका अंतर्गत मौजा कोलितमारा येथे दिनांक 24/01/2024 रोज बुधवारला श्री.राजेंद्र मुळक (माजी मंत्री अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी) यांच्या संकल्पनेतून अनेक वर्षापासून राजेंद्र मुळक सहायता कक्षाच्या माध्यमातून रामटेक विधान सभा क्षेत्रातील प्रत्येक गावातील गरजू लोकांना जनहितार्थ राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळावा.

           या करीता मौजा कोलितमारा येथे मोफत वैद्यकीय तपासणी,नेत्र तपासणी तथा निःशुल्क चष्मा वाटप इत्यादी आरोग्य सेवांचा लाभ सर्वसामान्य लोकांना मिळवून देण्यात आला.

         या प्रसंगी सौ.रामकलीताई पुरमाले(सरपंच कोलीतमारा), श्री.विठ्ठलजी पाटील,श्री.विजय गेडाम,श्री.मुंगुभाऊ उरमाले,श्री.शेषराव खंडाते,श्री. सुखराम उइके,श्री.बाळकृष्णा खंडाते,श्री.हेमराज इनवाते,सौ.राधिकाताई खंडाते (सदस्य ग्रा.प.कोलितमारा ),श्री.मोटू खंडाते,श्री.अंकुश खंडाते,श्री.विलास इनवाते,श्री.चुटे सर,श्री.रघुनाथ कोडवते,सौ.सरस्वतीबाई कोडवते,श्री.ज्ञानेश्वर खंडाते,श्री.अशोक कोडवते,श्री. अंकुश खंडाते इत्यादी मान्यवर व ग्रामवासीगण उपस्थित राहून कोली तमारा गावातील नागरिकानी शिबिराचा लाभ घेतला.