Home Political आईला नगरसेविका करताना विवेक घुंडरे यांची रणनिती यशस्वी…

आईला नगरसेविका करताना विवेक घुंडरे यांची रणनिती यशस्वी…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : प्रभाग क्रमांक ७ मधील निवडणूक यावेळी अतिशय चुरशीची ठरली. पुढे कडवे आव्हान असतानाही विवेक घुंडरे यांनी अचूक रणनीती आखत आपल्या आईला नगरसेविका करत विजयश्री खेचून आणली. या लढतीत माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील यांच्या पत्नी ज्योती चिताळकर पाटील यांचा पराभव झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

        विवेक घुंडरे हे स्वतः प्रभाग क्रमांक ७ मधून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. मात्र अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपकडून तिकीट न मिळाल्याने त्यांनी डावपेच बदलत आपल्या आईला महिला प्रवर्गातून उमेदवारी दिली. बदललेल्या परिस्थितीतही त्यांनी प्रचाराची संपूर्ण सूत्रे स्वतः हातात घेत घराघरांत संपर्क साधला.

         अतिशय तंग झालेल्या या निवडणुकीत अखेर घुंडरे कुटुंबाने बाजी मारली. स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित केलेला प्रचार, कार्यकर्त्यांची एकजूट आणि मतदारांशी थेट संवाद यामुळे हा विजय शक्य झाल्याचे बोलले जात आहे. या निकालामुळे प्रभाग क्रमांक ७ मधील राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वाचा बदल झाल्याचे स्पष्ट झाले आहे.