Home Social आळंदी देवस्थानकडून नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांचा सत्कार…

आळंदी देवस्थानकडून नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांचा सत्कार…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : आळंदी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांचा आळंदी देवस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी नतमस्तक होत नगराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारलेल्या प्रशांत कुऱ्हाडे यांचे देवस्थानकडून अभिनंदन करण्यात आले.

         देवस्थान ट्रस्टच्या वतीने नगराध्यक्ष कुऱ्हाडे यांना गौरविण्यात आले. यावेळी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजनाथ, विश्वस्त डॉ.भावार्थ देखणे, हभप पुरुषोत्तम महाराज पाटील, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर उपस्थित होते.

         यावेळी नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे म्हणाले, की “आळंदी ही संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांनी घडलेली पवित्र ज्ञानभूमी आहे. अशा संतांच्या नगरीचा नगराध्यक्ष म्हणून सेवा करण्याची संधी मिळणे, हे माझे भाग्य आहे. आळंदी देवस्थानकडून झालेला सन्मान हा माझ्यासाठी केवळ गौरव नसून जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे.

         नगराध्यक्षपदाच्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य व भाविकांसाठी आवश्यक सुविधा अधिक सक्षम करण्याचा माझा संकल्प आहे. देवस्थान, नगरपरिषद, सर्व लोकप्रतिनिधी व आळंदीकर नागरिक यांच्या सहकार्याने पारदर्शक व विकासाभिमुख कारभार करण्याचा मी प्रयत्न करीन. संतांच्या आशीर्वादाने आळंदीचा लौकिक अधिक उज्ज्वल करण्यासाठी अखंड कार्यरत राहीन.”