पयडी गाव एटापल्ली तालुक्यातून वगळून गडचिरोली तालुक्यात समाविष्ट करा ग्राम सभेची मागणी… — पुणे करार धिक्कार दिन साजरा…

ऋषी सहारे

संपादक

        गडचिरोली _ एटापल्ली तालुक्यातील पयडी येथे पुणे करार धिक्कार दिना निमित्य बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सल्लागार राष्ट्रीय आदिवासी एकाता परिषद चें नितिन पदा ‘ हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन रिपाईचे जिल्हा अध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर , जिल्हा प्रभारी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद चे भोजराज कान्हेकर , ज्ञानेश्वर मुजंमकार , उपसरपंच महादेव पदा , आदि लाभले होते.

       याप्रसंगी मुनिश्वर बोरकर म्हणाले की ‘ पयडी गाव हे एटापल्ली तालुक्यात 52 कि.मी. अंतरावर आहे. तर गडचिरोली तालुकाचे अंतर 42 कि. मी. अंतरावर असुन पयडी ची बाजारपेठ पोटेगांव व गडचिरोली आहे. एटापल्ली हे पयडीसाठी तालुका पुरती मर्यादित अतिदुर्गम भाग आहे. तेव्हा पयडी गांव हे गडचिरोली तालुक्यात समाविष्ट करावा अशी मागणी शासनाकडे रेटून धरण्यात येइल. याप्रसंगी कान्हेकर म्हणाले की , पुणे करारामुळे आमचे जे खासदार _ आमदार निवडून जातात ते ज्या समाजातून निवडून जातात त्या समाजाचे नेतृत्व न करता. पार्टीचेच बाजु घेतात. म्हणुन डॉ. बाबासाहेबांनी म्हटले होते की , मला संसदेतील खांबाला लटकवून फॉसी घ्या पण मी पुणे करारावर सही करणार नाही. म्हणुन आज पुणे करार धिक्कार दिन साजरा करण्याची वेळ आली. U CC कायदा रद्द करण्यात यावा. आदिवासीचा वनहक्क 2023 चा कायदा रद्द करण्यात यावा. महिला आरक्षणात आदिवासींच्या महिलांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावे असेही कान्हेकर यांनी सागीतले.

        मुजमकार यांनी म्हटले की, आज देशात संविधान आहे. म्हणुन आमचे हक्क व अधिकार अबादित आहेत. म्हणुन संविधानाचे संरक्षण करणे सर्वाची जबाबदारी आहे. बैठकीला सचिव दिनेश वट्टे ‘ सोनु नरोटे ‘ वासुदेव होळी , लालसु वड्डे , सुधाकर होळी , लालु पदा , गजु मडावी, हरिदास होळी , नागसु वड्डे , दिपक पदा,सहीत बहुसंख्य आदिवासी बांधव उपस्थित होते.