बाबासाहेब कसे घडले आणि कसे बनले,याचा विसर न पडता त्यांचे उर्वरीत कार्य जोमाने करण्यासाठी सर्वानी एकसंघ व्हावे- राजरतन आंबेडकर 

ऋषी सहारे

संपादक

        गडचिरोली _ विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जिवनात हाल,अपेष्ठा सहन करून जगविख्यात मोठे महान नेते बनले. 

        ज्यांनी भारतासाठी महान राज्यघटना तयार करून संविधानाच्या माध्यमातून तमाम बहुजनांना त्यांचे हक्क ‘ अधिकार ‘ न्याय , स्वातंत्र . समता ‘ बंधुता , बहाल केली. त्यांचे उपकार आपण कधिही विसरता कामा नये. 

         त्यांचे उर्वरीत कार्य करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. ती आपण सर्वानी एकजुटीने पुर्ण करुया,अशा प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन डॉ. आंबेडकरांचे नातू व दि.बुध्दिष्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष (मुंबई) ‘डॉ. राजरतन आंबेडकर यांनी रामाळा येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचा पुर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळा प्रसंगी केले. 

       चामोर्शी तालुक्यातील रामाळा येथील पंचशिल बौद्ध समाज मंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा शिक्षण महर्षी भिमराव गोवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला तर खोरीपाचे जेष्ठ नेते मानिकराव तुरे अनावरण कार्यक्रमाचे सहउदपाटक म्हणून प्रामुख्याने उपस्थित होते.प्रमुख मार्गदर्शक म्हणुन डॉ.राजरतन आंबेडकर हे होते.

        तत्पूर्वी भदंन्त करूणा बोधी,भदंन्त मैत्री बोधी,भदन्त सत्यपाल,भदंन्त प्रज्ञाज्योती,भदन्त नंदवर्धन आदी पुज्य भन्तेच्या हस्ते विधिवत वंदना घेण्यात आली.

        या प्रसंगी बुद्धीष्ट सोसायटीचे केंद्रिय अध्यक्ष विजय बन्सोड,सरपंच अरुण देवतळे,माजी इजि.नरेश मेश्राम , राजकीय व सामाजीक प्रवक्ते धर्मानंद मेश्राम,महासचिव धम्मराव तानादु विदर्भ प्रतिनिधी दर्शना शेन्डे ,रिपाईचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष गोपाल रायपुरे,शाम रामटेके आदी सहीत बहुसंख्य सामाजीक व राजकीय नेते मंचकावर उपस्थित होते.

          डॉ.राजरतन आंबेडकर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संपूर्ण जिवन पटावर विश्रृत माहीत देत असतांना भारतीय बौध्द महासभेचा प्रमुख धोपडी वाले काका यांनी राजरतन यांना गडचिरोली जिल्ह्यातील आपली बॅक जागतिक बँक कसी होत आहे या विषयी बोलायला सागीतले.

         याप्रसंगी जेष्ठ नेते मानिकराव तुरे,विजय बन्सोड यानीही मार्गदर्शन केले.रात्रौ वादळ निळ्या क्रांतीचे प्रकाश मेश्राम चिमुर यांचा भिम गिताचा कार्यक्रम पार पडला. 

        कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मंडळाचे अध्यक्ष विलास देवतळे,सचिव सचिन दुर्गे,उपाध्यक्ष दादाजी खोब्रागडे यांनी अथक परिश्रम घेतले.

          अनावरण कार्यक्रमास बहुसंख्य नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.