ब्रेकिंग न्युज…. अंजनगाव ते दर्यापूर मार्गावर भिषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू, सहा जण गंभीर जखमी… — खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील घटना…

 

युवराज डोंगरे 

  उपसंपादक

        खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील अंजनगाव ते दर्यापूर मार्गावरील लेहगाव ते इटकी फाट्याच्या जवळ  सोमवारी (२२)मे च्या रात्री अकरा वाजताच्या सुमारास भरधाव आयशर ट्रकने टाटा एसला मागून जबर दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा धक्कादायक मृत्यू झाला असून ६ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.  एम.एच.०४, ई.एल. ९६६४ या आयशर ट्रकने    टाटा एस .एम.एच.३० एल. ३३६५  या वाहनाला मागून जबरदस्त धडक दिल्याने या धडकेत एकाच कुटुंबातील ५ जणांचा धक्कादायक मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आलेली आहे तर यातील ६ जण हे गंभीर जखमी झाले असून जखमींना अमरावती येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

टाटानगर बाभळी येथील एकाच कुटुंबातील  सर्व ११ जण सोमवारी सायंकाळी अंजनगाव येथे लग्नप्रसंगी कार्यक्रमात गेले होते. कार्यक्रम संपवून दर्यापूर कडे येत असताना इटकी जवळ अंजनगाव मार्गावरून मागून भरधाव आयशर ट्रकने मागून टाटा एस ला जबर धडक दिली या धडकेत 3 जणांचा जागीच मुत्यूं झाला. तर अन्य 2 जण अमरावती रेफर करतांना वाटेतच मरण पावले आहे. सदर घटनेची माहिती होताच परिसरातील नागरिकांनी दर्यापूर येथे रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती. सदर घटना ही खल्लार पोलीस स्टेशन हद्दीत येते. मृतामध्ये २ लहान मुले, २ महिला व १ पुरुष यांचा समावेश असून सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत. आयशर ट्रक चालक हा फरार झाला झाला असून अपघाता संदर्भा पुढील तपास खल्लार पोलीस करीत असून खल्लार पोलिसांत अज्ञात आयशर ट्रक चालक याच्या विरुध्द कलम २७९,३०४(अ),३३७,३३८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघातातील मृतक

शेख अजहर शेख अनवर(३०),पत्नी नासिया परवीन शेख अजहर(२४),मुलगी अनशरा परवीन शेख अजहर(३),आई नफिसा परवीन शेख अनवर(४५),पुतण्या शेख अनस शेख असलम(२)रा सर्व टाटा नगर बाभळी

जखमी:-सायना परवीन शेख अनवर, आसमा परवीन शेख अनवर, मुस्कान परवीन कलिम शेख, आयशा शेख शकील, अलमास शेख एझाज अंश शेख शकील