आज ठरणार पारशिवनी कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती व उपसभापती….  — अविरोध निवड होणार सभापती-उपसभापती पदाची..

कमलसिंह यादव 

 प्रतिनिधी

पारशिवनी :-

         पारशिवनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालकांच्या निवडीकरिता दिंनाक २८ एप्रिल २०२३ ला झालेल्या निवडणुकीत काँग्रेस समर्पक शेतकरी सहकार पॅनलचे १८ ही उमेदवार बहुमताने निवडून आले. 

      त्यामुळे पारशिवनी कृषी उत्पन्न बाजार समिती वर काँग्रेस पक्षाची एक हाती सत्ता राहणार असल्याचे स्पष्ट झाले.

       पारशिवनी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व उपसभापती पदाची निवडणूक आज दिनांक २४ मे २०२३ ला होत आहे. ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.पण सभापती व उपसभापती पदावर कोण विराजमान होणार, कोणाची वर्णी लागणार हे मात्र वेळेवरच कळणार…

        कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पदांच्या निवडणुकीत निवडून आलेले उमेदवार उमेदवार 

१) अशोक बाळाजी चिखले. २)आत्माराम शिवाजी उकुंडे ३) शालीक रामराव ढोंगे ४) सुभाष मुलचंद तडस ५) प्रकाश निलकंठ मेश्राम. ६) सुरेश शेषराव राऊत. ७). विठ्ठल पंजाबराव वडस्कर. ८) सुधाकर चिंतामणराव उमाळे. ९)सिमा भारत देशमुख. १०)सिताबाई सुरेश भक्ते. ११)संदीप दिलीप सिंग यादव. १२)वैभव नारायण खोब्रागडे १३) प्रेमचंद रामदास कुसुंबे

१४) जिवलग चंद्रभानजी चव्हाण.

व बिनविरोध निवडून आलेले. १५) सचिन आमले. १६) दिपक वर्मा. १७) मोहन राऊत १८) वासुदेव कठाने. हे शेतकरी सहकार पॅनलचे १८ ही उमेदवार बहुमताने निवडून आले आहेत.

विजयाचे शिल्पकार

        पारशिवनी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत आपले १८ ही उमेदवार बहुमताने निवडून आणण्यासाठी.माजी मंत्री सुनील बाबू केदार व राजेंद्रजी मुळक व चंद्रपालजी चौकसे यांच्या चाणक्य नीती अन्वये कुशल राजकीय मार्गदर्शनात दयारामजी भोयर अध्यक्ष पारशिवनी तालुका,श्रीधरजी झाडे महासचिव,राजुभाऊ कुसुंबे शिक्षण सभापती,प्रकाशभाऊ डोमकी,मुरलीधरजी निंबाळकर, रमेश बाबू जोध,सौ.अर्चनाताई भोयर जिल्हा परिषद सदस्या,सौ. मंगलाताई उमराव निंबोने सभापती पंचायत समिती पारशिवनी,उपसभापती करूणाताई भोवते,सौ.रस्मीताई बर्वे माजी अध्यक्ष जिल्हा परिषद नागपूर,डुमनजी चकोले,सिध्दार्थ खोब्रागडे,आदीसह निष्ठावान कार्यकर्ते हे कृषी उत्पन्न बाजार समिती पारशिवनीच्या विजयाचे शिल्पकार ठरले.

 

**पारशिवनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदावर कोण होणार विराजमान?*

 

 पारशिवनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रभारी सभापती म्हणून अशोक बाळाजी चिखले यांनी कुशलता पुर्वक कार्यभार सांभाळला व आपल्या कार्यकाळात कृषी उत्पन्न बाजार समितीचा विकासाच्या दृष्टीने सतत वाटचाल करीत गोडावुन बांधकाम,लिलाव गृह,शेतमाल तारण योजना,विदर्भ मार्केटिंग फेडरेशन व्दारे तुर,चना खरेदी,जनावरांचा बाजार,अशाप्रकारची शेतकरी हितासाठी कार्य केले.

       अशोक चिखले यांचा पुर्व अनुभव हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हितासाठी उपयुक्त ठरणार आहे. 

        त्यामुळे होणाऱ्या सभापती पदाच्या निवडणूकीत सभापती पदाची माळ ही अशोकराव बाळाजी चिखले यांच्याच गळ्यात पडणार असल्याचे बोलले जात आहे तर उपसभापती म्हणून संदीप दिलीपसिंग यादव यांच्या नावाची घोषणा होणार असल्याचे संकेत आहेत.