माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कुमारी सुहानी श्रीमंत पडळकर या विद्यार्थिनीचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.  — सुहानी पडळकर ही बारावी सी.बी.एस.इ.बोर्ड परीक्षेमध्ये 96% टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवल्या बद्दल सन्मान संपन्न झाला.

नीरा नरसिंहपुर दिनांक 23

प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,

      पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील पडळकर कुटुंबातील श्रीमंत आंकुश पडळकर सर यांची कन्या सुहानी पडळकर या विद्यार्थिनीने सी.बी.एस इ.बोर्ड बारावी परीक्षेमध्ये 96% टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवीला. याबद्दल माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

       सत्कार प्रसंगी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे बोलत आसताना म्हणाले की,आपल्या इंदापूर तालुक्यातील प्रत्येक विद्यार्थ्याने शिक्षण क्षेत्राचा पाया भक्कम करून आपले गुणसंपन्न करावे. चांगल्या दर्जाचे शिक्षण घेऊन नोकरी मिळालीच पाहिजे. ही आठवन सर्व विद्यार्थ्यांनी विसरू नका पालकांनी देखील विद्यार्थ्यांना चांगल्या मार्गाने शिक्षण पूर्ण करून मुलांचे भावी आयुष्य प्रगतीच्या दिशेने घेऊन जावे. ही काळाची गरज राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे यावेळी उदगार.

       विद्यार्थिनी सुहानी पडळकर यांचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच सर्वच पडळकर कुटुंबाचे देखील अभिनंदन केले. सर्वच,थरातून व तालुक्यातून या विद्यार्थ्यांचे कौतुक होऊ लागले.

       तसेच या विद्यालयाचे श्री. डॉक्टर कदम व सौ.कदम मॅडम, प्रिन्सिपल व सर्व शिक्षक यांनी याबद्दल कौतुक करून आशीर्वाद दिले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या, पडळकर कुटुंबात 96% टक्के गुण मिळवणारी पहिलीच विद्यार्थीनी आसल्यामुळे सर्व स्तरातून शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी ग्रामस्थ या सर्वांच्या वतीने इंदापूर तालुक्यात कौतुक करून शाब्बासकी मिळवली.

        या कार्यक्रमासाठी पिंपरी गावचे विद्यमान सरपंच ज्योती श्रीकांत बोडके, माजी सरपंच श्रीकांत बोडके, ग्रामपंचायत सदस्य संतोष सुतार, माजी चेअरमन सुदर्शन बोडके, शिक्षक श्रीमंत पडळकर सह सर्वच पडळकर कुटुंब उपस्थित होते.

           पिंपरी बुद्रुक येथील श्रीमंत आंकुश पडळकर हे चैतन्य विद्यालय नीरा नरसिंहपूर या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. यांच्या कन्येने बारावीत उत्कृष्ट रित्या चांगले गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला म्हणून इंदापूर तालुक्यात नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये डॉक्टर कदम गुरुकुल इंदापूर या विद्यालयाच्या नावाची ओळख झाली. श्रीमंत पडळकर सर ,यांचे डॉक्टर कदम गुरुकुल इंदापूर,व चैतन्य विद्यालय नीरा नरसिंहपूर यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.