आदिवासी विकास विभागा तर्फे कुवारा भिवसेन आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाला प्रारंभ.. — २२ ते २५ फेब्रुवरी पर्यंत चालणार माहोत्सव.

    कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी

पारशिवनी : पारशिवनी शहरातील येथील गारपेठ आखाडा मैदानावर २२ फेब्रुवारीपासून २५ फेब्रुवरी पर्यंत कुंवारा भिवसेन आदिवासी महोत्सवाला आदिवासी विकास विभाग तर्फे सुरुवात झाली आहे.

       या महोत्सवला रांगोली स्पर्धी,फोटोग्राफी पेटींग स्पर्धा,आदिवासी नृत्य,आदिवासी वेशभुषा स्वधी,कर्मा लोकनृत्य,आदिवासी सांस्कृती,सेला,गोंडी वाद्य प्रदर्शन,महाकाल तांडव,खादप स्पर्धा,सायकल सफारी,बिट सफारी,वन भ्रमण,तौका,फायर शो,चे आयोजन होणार असल्याची माहीती प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नागपुर तर्फे देण्यात आली.

       महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सुप्रसिद्ध गायक हंसराज रघुवंशी यांच्या भक्तिगीतांनी उपस्थिताना रिझविले.हजारो प्रेक्षकांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.’पारबती बोले शंकर से, मेरा भोला है भंडारी,शिव समा रहे मुझ में… और मैं शून्य हो गयी…’अशा अनेकानेक गीतांनी वाहवाही मिळविली. 

       कुवारा भिवसेन आदीवास्त सांस्कृतिक महोत्सवाला विधानसभा सदस्य आशिष जयस्वाल यांच्या पुढाकाराने सुरुवात झाली.या महोत्सवाकरिता राज्य शासनाचे आदीवासी विभागातंर्गत निधी अंतर्गतआदीवासी सांस्कृतिक महोत्सव होत असल्याचे विधानसभा सदस्य आशिष जयस्वाल यांनी सांगितले. 

         कुंवारा भिवसेन महोत्सवाचे उद्घाटन विधानसभा सदस्य जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोकसभा सदस्य कृपाल तुमाने,शांताबाई कुमरे जि.प.सदस्य तथा आदिवासी नेते उपस्थित होते. 

        तसेच श्रीमती विजय लक्ष्मी बिदरी अप्पर आयुक्त आदिवासी आदिवासी विकास नागपुर,विजय वाघमारे सचिव आदिवासी विकास विभाग,श्रीमती नयना गुंडे आयुक्त आदिवासी विकास विभाग नासिक,रविन्द ठाकरे अत्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग नागपुर,विपिन ईटननर जिल्हाधिकारी नागपुर,सौम्या शर्मा मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.नागपुर तसेच संबंधित सर्व अधिकारी हे प्रामुख्याने उपस्थित आहे. 

      शुक्रवार २३ फेब्रुवारीला प्रख्यात नायिका पद्मश्री हेमामालिनी यांच्या गंगा नृत्यनाटिकेचे सादरीकरण होणार आहे तर २४ फब्रेवरी शनिवारला ‘कुवारा भिवसेन’ महानाटक आणी २५ ला प्रख्यात पार्श्वगायक मोहित चौहान यांच्या सदाबहार गाण्यांचा कार्यक्रम आयोजित आहे. 

        यामुळे सदर मोहोत्सवातंर्गत कार्यक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन नितिन इसोकर प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विभाग प्रकल्प नागपुर यांनी केले आहे.