Home Political आळंदी नगरपरिषद निवडणूक : प्रभाग क्रमांक ६ मध्ये माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे...

आळंदी नगरपरिषद निवडणूक : प्रभाग क्रमांक ६ मध्ये माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे यांचाच आवाज… — भाजपचे सागर कुऱ्हाडे व साक्षी कुऱ्हाडेंचा दणदणीत विजय…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ६ मध्ये भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व कायम राखत एकतर्फी विजय नोंदवला. भाजपचे उमेदवार सागर कुऱ्हाडे व साक्षी कुऱ्हाडे यांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला. माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे यांनी नियोजन बध्द प्रचार करत मतदारांचा विश्वास पुन्हा एकदा संपादन केला.

        पहिल्या जागेसाठी झालेल्या लढतीत भाजपचे सागर कुऱ्हाडे यांना ७२३ मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरीष कारेकर यांना ५५५ मते मिळाली. सागर कुऱ्हाडे यांनी १६८ मतांच्या फरकाने विजय मिळवला. दुसऱ्या जागेसाठी भाजपच्या साक्षी कुऱ्हाडे यांनी ९११ मते मिळवत राष्ट्रवादीच्या लतिका वाघमारे (४४५ मते) यांचा ४६६ मताधिक्याने पराभव केला.

          या विजयामागे माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे व माजी सभापती श्रीधर कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेला शिस्तबद्ध व संघटित प्रचार निर्णायक ठरला. विकासकामांचा लेखाजोखा, स्थानिक प्रश्नांवर ठाम भूमिका आणि कार्यकर्त्यांची एकजूट यामुळे भाजपला मतदारांचा मोठा पाठिंबा मिळाल्याचे चित्र दिसून आले.