माणसाच्या उत्पत्तीच्या तीन अवस्था आहेत, जनावर, माकड, माणुस.
माणुस जेंव्हा जनावर होता तेंव्हा त्याच्या बुद्दीची वाढ झाली नव्हती, बुद्धी संकुचित होती, म्हणजेच विचार संस संकुचित होते, मेंदू छोटा होता, मेंदू जसा जसा मोठा व्हायला लागला तशी तशी त्याची बुद्धी पण व्यापक व्हायला लागली, जनावर अवस्थेत तो हिंस्र प्राणी म्हणून पण वावरत होता, भांडणे मारामाऱ्या हिंसा आणि शाकाहारी प्राण्यांना तो मारून खात होता,
त्याची दुसरी अवस्था म्हणजे माकडाची अवस्था, या अवस्थेत त्याचा मेंदू मोठा झाला म्हणजेच बुद्धी थोडी विकसित झाली, आणि तो विचार करायला लागला. हळूहळू तो चार पायावरून दोन पायाने चालू लागला आणि त्याची शेपटी झडून गेली, आणि तो गोरिला बनला, गोरिला पासून नंतर तो माणूस बनला.
माणूस ही त्याची तिसरी अवस्था होय. या अवस्थेत तो दोन पायाने चालू लागला आणि दोन हाताने काम करू लागला आणि बुद्धीचा विकास झाल्यामुळे, म्हणजे मेंदूची वाढ परिपूर्ण झाल्यामुळे त्याला चांगले आणि वाईट, आपल्या उपयोगाचे आणि बिन उपयोगाचे काय ते कळायला लागले, आहेत आणि आहेत काय ते कळायला लागले, म्हणजे तो बुद्धीचा वापर करू लागला, बुद्धीच्या पुढची गोष्ट म्हणजे विवेक, पुढे तो विवेकाचा पण उपयोग करू लागला,
आणि जेव्हा तो विवेकाचा वापर करू लागला तेव्हा तो विकृत अवस्थेतून संस्कृत अवस्थेत आला. या अवस्थेत पण त्याला अधून मधून विकृतीचे झटके येतच असतात.
अहंकार, मान, लोभ, द्वेष, कपट, राग, हे दुर्गुण म्हणजे जनावरतील गुण अजूनही माणसात दबी धरून बसलेलेच आहेत. प्रसंगनुसार ते अधूनमधून बाहेर उफाळून येतात. संयमाने यांस दाबावे लागते. संयम तुटला म्हणजे तोल गेला कीं माणुस घसरतो. आणि नको ते बरळतो. अशावेळी तो त्याचे कर्तव्य पण विसरतो. मुकतो. तेंव्हा तो माणुस न राहता परत जनावरच्या अवस्थेत जातो, त्याचे बोलणे वागणे कृती सर्व व्यवहार हिंसक बनतो. अशा अवस्थेत त्याला आई बाप पत्नी बहीण भाऊ पत्नी मुले शेजारी. मित्र नातेवाईक हे सारे संबंध तुच्छ वाटायला लागतात. तो एकटा पडतो, आणि जाणवरासारखा वागसायला लागतो.
उपकाराची जाणीव नसणे, बेईमान होणे, खोटे बोलणे, उरफाटे बोलणे, धमक्या देणे, घरातून सगळ्यांना हाकलून देणे, किंवा स्वतःच गृहत्याग करणे, हातघाई वर येणे, असे नको ते उपदव्याप तो करु लागतो. थोडक्यात तो आपण माणुस असल्याचे भान तो विसरून जनावर अवस्थेत जातो, त्याचे सारे वागणे हिंसक बनते.
माणुस जेंव्हा माणसाच्या अवस्थेत असतो तेंव्हा तो शांत संयमी असतो, राग मान माया लोभ अहंकार या विकृती पासून दूर राहून समोर आलेल्या संकटाचा सामना करीत असतो. जीवन जगत असताना अनेक समस्या येतात, त्यावर तो इतरांना समोर बसवून त्यावर शांत पणे चर्चा संवाद करून त्यावर तोडगा काढीत असतो. अशी कृती फक्त मनुष्य या अवस्थेतच शक्य आहे.
जनावर प्राणी या अव्वस्थेतून मानव मनुसयाच्याअवस्थेत आला, त्यास हक्क कळायला लागले, म्हणून तो गुलामीतून बाहेर पडला. परंतु हक्का बरोबरच कर्तव्यची जाणीव अजूनही नसल्यामुळे मानव हा माणूस या अवस्थेत परिपूर्ण झाला नाही. शरीराने परिपूर्ण झाला, पण विवेकाने नाही, म्हणजे सारीच माणसे ही माणसे आहेत असे नाही, तर त्यातील जे विवेकाचा वापर करतात, जे संस्कृत आहेत, ज्यांनी विकृती सोडली, हक्कापेक्षाही जास्त कर्तव्यचे पालन जे करतात तेच परिपूर्ण माणूस आहेत. असे समजावे.
खोटे बोलणे, धोका देणे, विस्वासघात करणे, कर्तव्य पालन न करणे, स्वकर्तृत्वावर विस्वास नसणे, परावलंबी जीवन जगणे, दुसऱ्याच्या जीवावर उड्या मारणे, इतरांचे ऐकणे, स्वतःची बुद्दीचा वापर न करणे म्हणजे अपूर्णतेचे लक्षण होय.
हक्काचा अधिकार आणि कर्तव्याचे पालन म्हणजेच पुरुषार्थ होय. जो पुरुषार्थचे जीवन जगतो, तोच माणूस.
लेखक : दत्ता तुमवाड
सत्यशोधक समाज नांदेड
दिनांक : 22 डिसेंबर 2025, फोन : 9420912209.


