दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : आळंदी नगरपरिषद निवडणुकीतील प्रभाग क्रमांक ४ मध्ये भाजपने प्रभावी विजय मिळवत आपले वर्चस्व कायम ठेवले. भाजपच्या कांचन येळवंडे आणि गोविंदा कुऱ्हाडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव करत दणदणीत यश संपादन केले.
पहिल्या जागेसाठी झालेल्या लढतीत भाजपच्या कांचन येळवंडे यांना १०४८ मते मिळाली, तर राष्ट्रवादीच्या पुजा कुऱ्हाडे यांना ८९४ मते मिळाली. शिवसेनेच्या उमेदवार हिरकणी धुर्वे यांना १४४ मते पडली. कांचन येळवंडे या १५४ मतांच्या फरकाने विजयी ठरल्या. दुसऱ्या जागेसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे गोविंदा कुऱ्हाडे यांना १३०३ मते मिळाली, तर राष्ट्रवादीचे योगेश कुऱ्हाडे यांना ७४९ मते मिळाली. गोविंदा कुऱ्हाडे यांनी ५५४ मतांच्या फरकाने शानदार विजय मिळवला.
उत्कृष्ट संघटन, काटेकोर नियोजन आणि शिस्तबद्ध प्रचार हे या विजयाचे मुख्य आधार ठरले. बूथनिहाय आखणी, कार्यकर्त्यांची सक्रियता आणि विकासाभिमुख प्रचारामुळे मतदारांचा कौल भाजपच्या पारड्यात गेला.
निकाल जाहीर होताच प्रभागात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला.



