छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय,आसेगाव येथे क्षेत्र प्रकल्प व संशोधन प्रकल्प विषयावर जिल्हास्तरीय कार्यशाळा..

युवराज डोंगरे/खल्लार

       उपसंपादक 

        छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय आसेगाव पूर्णा येथे समाजशास्त्र विभाग व पीएच.डी. संशोधन केंद्राच्या माध्यमातून “क्षेत्र प्रकल्प आणि संशोधन प्रकल्प” या विषयावर

 एक दिवशीय जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

           या कार्यशाळेत अमरावती जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील एम. ए.समाजशास्त्राचे 150 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

         कार्यशाळेत नवीन शैक्षणिक धोरण -2020 ला अपेक्षित संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार (NEP-23-24) एम. ए. समाजशास्त्रात भाग १ करीता क्षेत्र प्रकल्प व भाग २ करीता संशोधन प्रकल्प विभागात सादर करणे आवश्यक आहे.

        विद्यार्थ्यांना प्रकल्प सादरीकरणानंतर श्रेयांक व गुण देखील मिळणार आहेत.त्यामुळे या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यासाठी चिखलदरा येथील कला वाणिज्य महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शांताराम चव्हाण यांनी पावर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दोन सत्रांमध्ये प्रकल्पा करिता आवश्यक असणारे विविध फॉरमॅट दिले.

         या प्रसंगी डॉ.चव्हाण यांनी क्षेत्र प्रकल्प व संशोधन प्रकल्पाच्या आवश्यक सामाजिक संशोधनातील शास्त्रीय पायऱ्या सांगत उत्तम प्रकारे प्रकल्प कसा तयार करता येईल याबद्दल मार्गदर्शन केले.

         या कार्यशाळेसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय अमरावतीचे समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रदीप अंभोरे,महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय अमरावती येथील डॉ.संजय भगत,श्री. शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय अमरावतीचे समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ज्ञानेश्वर नामूर्ते,तसेच जीएस टोम्पे कॉलेज चांदूरबाजार येथील समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. श्याम येवतीकर उपस्थित होते.

            या कार्यशाळेचे प्रास्ताविक आयोजक डॉ.भारत कल्याणकर समाजशास्त्र विभाग प्रमुख यांनी केले.या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.हरीश काळे,डॉ.प्रवीण सदार,डॉ.रवींद्र इचे,प्रा.लिल्हारे,डॉ.आशिष काळे,कु.मुक्ता निंभोरकर,अविनाश कडू,संजय सोळंके,यांनी प्रयत्न केले.