सामान्य ज्ञान ऑलिम्पिऑड परीक्षेत नवजीवनचे यश…

     ऋग्वेद येवले

नागपूर विभागीय प्रतिनिधी

        साकोली :- नवजीवन कॉन्व्हेंट एंड इंग्लिश प्राय. स्कुल सीबीएसई जमनापुर/साकोली येथे सामान्य ज्ञान ऑलिम्पिऑड परीक्षेचे पदक व प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. बक्षिस वितरणाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मुजम्मिल सय्यद, प्रमुख उपस्थिती पर्यवेक्षिका वंदना घोडीचोर, वरीष्ठ शिक्षिका भारती व्यास, प्रशासकीस अधिकारी विनोद किरपान उपस्थित होते.

               विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने नवजीवन सीबीएसई मध्ये प्राचार्य सय्यद सरांच्या मार्गदर्शनात आंतरराष्ट्रीय सामान्य ज्ञान ऑलिम्पिऑड परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. विज्ञान ऑलिम्पिऑड परीक्षेत उज्वल यश संपादन करणाऱ्या ११ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकांचे वितरण करण्यात आले. या बक्षिस वितरण सोहळ्याप्रसंगी प्राचार्य मा. मुज्जमिल सय्यद सर यांनी पदक व प्रमाणपत्र वितरण करून सर्व विद्यार्थ्यांचा गौरव केला. विद्यार्थ्यांनी या यशाचे श्रेय प्राचार्य, पर्यवेक्षिका, वरिष्ठ शिक्षिका, प्रशासकीय अधिकारी व समस्त शिक्षकगण यांना दिले.

             संस्थेचे संस्थापक डॉ. ब्रम्हानंद करंजेकर, संस्था अध्यक्ष डॉ. सोमदत्त करंजेकर, सचिव सौ. वृंदताई करंजेकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यां चे कौतुक व अभिनंदन केले.

             सुवर्ण पदकाचे मानकरी ठरणारे विद्यार्थी श्रेयांश मेंडे, अनया बालोदे, स्माही पर्वते, अवनिश बहुरुपे, चैतन्य काशिवार, मनहर महल्ले, यथार्थ बोपचे, निश्चल पारधी, आयुष बिस्वास व निशेष साहु होते. कार्यक्रमाचे संचालन वंदना घोडीचोर तर आभार विशाखा पशिने यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता नवजीवन मधील शिक्षकवर्ग व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी बहुमोलाचे योगदान दिले.