खल्लार हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षणमहर्षी डॉ पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन..

युवराज डोंगरे/खल्लार

         उपसंपादक 

      श्री.शिवाजी शिक्षण,संस्था अमरावतीचे संस्थापक अध्यक्ष व शिक्षणमहर्षी डॉ पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंतीनिमित्य खल्लार हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात दि 25 ते 28 डिसेंबर पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

           दिनांक 25 डिसेंबरला सकाळी 9 वाजता संस्थेच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर,10 वाजता स्नेहसंमेलन व विविध स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.

          यात रांगोळी स्पर्धा,चित्रकला व हस्तकला स्पर्धा,डिश डेकोरेशन व पुष्प प्रदर्शनी,विज्ञान प्रदर्शनी, स्पर्धकांचा सहभाग असणार आहे.

          दि.26 डिसेंबरला सकाळी 10 वाजतापासून प्रश्न मंजुषा,वादविवाद स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम साजरा होणार आहे तर 27 डिसेंबरला डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करुन गावातून प्रभात फेरी निघेल व त्यानंतर वक्तृत्व स्पर्धा होणार आहे.

        28 डिसेंबरला सकाळी 10 वाजता आनंद मेळावा व त्यानंतर बक्षिस वितरण समारंभ पार पडेल.

        या सर्व कार्यक्रमाला श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य प्राचार्य केशवराव गावंडे,सुरेश खोटरे,आमदार बळवंत वानखडे,मधुसूदन धाबे,सुधाकर जुनघरे,गुणवंत गावंडे,पंजाबराव टवलारे,विनायक सगणे, कमलेश्वर कराळे, केशव येवले, भागवत बुरघाटे, जयवंत डिके, एस जी मोपारी, व्ही डब्ल्यू गावंडे, खल्लारचे सरपंच आरीफ शहा युनूस शहा, उपसरपंच सौ पुजाताई विजय खंडारे, अजाब लांडे,दिपक इंगळे, सौ सारीकाताई कोकणे, सौ पुनमताई सावरकर, खल्लारच्या ठाणेदार चंद्रकला मेसरे,खल्लार हायस्कुलचे सर्व कर्मचारी आदी मान्यवर व विद्यार्थी वर्ग उपस्थित राहणार असल्याची माहिती खल्लार हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप नवरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.