युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
दर्यापूर येथिल प्रख्यात विधिज्ञ तथा नागरिक हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष ऍड.संतोष कोल्हे हे दरवर्षी दिवाळी सणाचे निमित्त साधून विविध उपक्रमांचे आयोजन करीत असतात त्या पैकी प्रामुख्याने वंचित, अनाथ, समाजातील निराधार मुलांना ते दरवर्षी स्थानिक गाडगेबाबा निराधार आश्रमातील मुलांना दिवाळीच्या फराळाची मेजवानी देतात ह्या वर्षी सुद्धा लक्ष्मी पुजनाचे निमित्त साधून फराळाचे वाटप केले.
ह्या मधे त्यांच्या सहचारिणी व प्रसिद्ध समाज सेविका सौ. अंबिका ताई कोल्हे व मुले कुमार कबीर,व कुमार अमरजीत कोल्हे सहकार्य करतात.
ऍड .संतोष कोल्हे यांच्या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमा पासुन आजच्या तथाकथित समाज सेवकांनी बोध घेतला पाहिजे अशी प्रतिक्रिया नागरिक हक्क संरक्षण समिती चे सचिव शरद रोहणकर यांनी प्रसिद्धी माध्यमा समोर बोलतांना व्यक्त केली.



