Home देशविदेश आर.एस.एस चे नोंदणीकृत पत्र दाखवा किंवा ती संघटना अनधिकृत असल्यास त्यांच्यावर कारवाई...

आर.एस.एस चे नोंदणीकृत पत्र दाखवा किंवा ती संघटना अनधिकृत असल्यास त्यांच्यावर कारवाई करा:- वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.प्रकाश आंबेडकर..‌. — संभाजी नगर (औरंगाबाद) पोलिसांपुढे ठाकले कायदेशीर संकट!.‌ — अन्यथा २४ आक्टोबरला औरंगाबाद येथे होणार महामोर्चा!,महामोर्चाची जय्यत तयारी,१० लाख नागरिक महामोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती…

प्रदीप रामटेके 

  मुख्य संपादक

         वंचितचे पदाधिकारी विजय वाहुळकर आणि राहुल मकासरे यांच्यावर संभाजी नगर (औरंगाबाद) येथील पोलिसांनी,आर.एस.एस.च्या संबंधाने बेजबाबदारपणे गुन्हे दाखल केलीत…

              वास्तविकता आर.एस.एस.संघटना नोंदणीकृत नाही.एवढेच काय तर नियमानुसार शाळा व महाविद्यालयापुढे त्यांना सदस्यता नोंदणी करता येत नाही व संघटनेचा प्रचार सुध्दा करता येत नाही.यामुळे आर.एस.एस.च्या संबंधित सर्व पदाधिकाऱ्यांवर संभाजी नगर (औरंगाबाद) पोलिसांनी तातडीने गुन्हे दाखल करायला पाहिजे होती.

             एखाद्या महाविद्यालयापुढे किंवा शाळांपुढे गैर मार्गाने आर.एस.एस.ला सदस्य नोंदणी करता येत नाही किंवा संघटनेचा प्रचार सुध्दा करता येत नाही.असे असताना त्यांनी महाविद्यालयापुढे सदस्य नोंदणी करुन आणि संघटनेचा प्रचार करुन सरळ सरळ धर्मनिरपेक्षता,समता आणि समानता या तत्वाचे उल्लंघन केले आहे.

            अर्थात अशा प्रकारची गैर कृती करुन समाजासमाजात जातीय तेढ आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा गंभीर प्रकार आर.एस.एस.च्या संबंधितांनी केला आहे.

         असे असले तरी संभाजी नगर पोलीसांनी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांवर बेजबाबदारपणे आणि गैर मानसिकताद्वारे गुन्हे दाखल केलीत असे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

           तद्वतच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.प्रकाश आंबेडकर यांनी संभाजी नगरच्या संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना सांगितले आहे की आर.एस.एस.ही संघटना नोंदणीकृत असेल तर त्याबाबत तसे प्रमाणपत्र द्यावे किंवा अनधिकृत असल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी.

          वरील दोन्ही मुद्यांपैकी एका मुद्याला अनुसरून संभाजी नगर पोलीस (औरंगाबाद पोलीस) कायदेशीर मार्गाने पुढे येत नसतील तर २४ आक्टोंबर २०२५ ला संभाजी नगर येथील आर.एस.एस.च्या कार्यालयावर महा मोर्चा निघणार एवढे निश्चित झाले आहे…

         संभाजीनगर (औरंगाबाद) पोलिसांनी आर.एस.एस.च्या कार्यालयावर मोर्चा न नेता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा न्यावा अशी विनंती पुर्वक सुचना केली असल्याचे पुढे आले आहे.

          मात्र,वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.प्रकाश आंबेडकर यांनी संभाजी नगर येथील पोलिसांपुढे आर.एस.एस.संघटने बाबत उपस्थित केलेले दोन्ही मुद्दे न्यायसंगत व कायदेशीर असल्याने त्यांच्या पुढे कायदेशीर संकट उभे ठाकले आहे.

           वंचित बहुजन आघाडीच्या दोन पदाधिकाऱ्यांवर गैर मानसिकता द्वारे कारवाई करणे व त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे संबंधित पोलिस अधिकाऱ्यांच्या अंगलट येणार असल्याचे दिसून येते आहे.

        तद्वतच औरंगाबाद येथील विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठका घेऊन संभाजी नगर पोलीसांच्या गैर व बेजबाबदार कृती बाबत जनआंदोलन करण्याचे ठरविले आहे.

        येत्या २४ आक्टोंबरला महामोर्चाची जय्यत तयारी झाली असून या महामोर्चात १० लाख नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती आहे..