भाजपा युवा मोर्चाच्या वतीने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर – तेजस देवकाते

 

नीरा नरसिंहपुर दिनांक: 22

प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,

   भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा व हर्षवर्धन पाटील युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार दि. 24 ऑगस्ट रोजी इंदापूर महाविद्यालयामध्ये सकाळी 9 ते 5 यावेळेत भव्य रक्तदान शिबिर तसेच मोफत आरोग्य तपासणी व चष्मे वाटप याचे आयोजन केले असल्याची माहिती भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष तेजस देवकाते यांनी दिली.

    तेजस देवकाते म्हणाले की, राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस सामाजिक ऋणानुबंध जपत साजरा करण्यासाठी हर्षवर्धन पाटील युथ फाऊंडेशन तसेच भाजपा युवा मोर्चाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले असून यावेळी रक्तदात्याला आकर्षक असे स्मार्टवॉच दिले जाणार आहे. यावेळी नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे. चष्मे वाटप देखील या शिबिरात केले जाणार आहेत.

     रक्तदान सर्वश्रेष्ठ दान असून या शिबिरात आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हावे तसेच आपली मोफत आरोग्य तपासणी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.