हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्व प्रभावशाली – उदयसिंह पाटील… – निरा भीमा कारखान्यावर वाढदिवस उत्साहात…

 

 निरा नरसिंहपुर दिनांक 21

प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,

         भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे राज्यातील एक संस्कारक्षम व अभ्यासू नेतृत्व असून, त्यांचे व्यक्तिमत्व नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असेच आहे. राज्यात काम करीत असताना हर्षवर्धन पाटील यांनी आपले प्रभावशाली नेतृत्व सिद्ध केले आहे, असे गौरवोद्गार नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील यांनी सोमवारी (दि.21) काढले.

           शहाजीनगर येथील नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्यावरती हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी, वृक्षारोपण, केक कापणे आदी विविध कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानावरून उदयसिंह पाटील बोलत होते.

     उदयसिंह पाटील पुढे म्हणाले, हर्षवर्धन पाटील यांचे व्यक्तीमत्व दूरदृष्टीचे असून त्यांच्याकडे सतत जनतेच्या, शेतकऱ्यांच्या विकासाचा विचार असतो. राज्यातील सहकार क्षेत्रातील ते ज्येष्ठ व अभ्यासू नेते आहेत. आगामी काळ हा भाऊंसाठी राजकीय प्रतिष्ठा वाढविणारा व अतिशय प्रगतीचा असणार आहे. नीरा भीमा कारखाना हा चालू गळीत हंगामापासून पूर्वीचे गतवैभव प्राप्त करेल, असे उदयसिंह पाटील यांनी भाषणात स्पष्ट केले.  

       याप्रसंगी बोलताना कारखान्याचे उपाध्यक्ष कांतिलाल झगडे यांनी सांगितले की, हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्व विकासाभिमुख आहे. इंदापूर तालुक्याला हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्व लाभले आहे, हे आपणा सर्वांचे भाग्य आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली निरा भिमा कारखान्याचा अडचणीचा काळ आता संपला आहे, असेही त्यांनी सांगितले.

       यावेळी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, राजवर्धन पाटील, अँड.कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, हरिदास घोगरे, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, दत्तात्रय पोळ, जबीन जमादार, कार्यकारी संचालक हेमंत माने तसेच माणिकराव खाडे, संतोष जगताप, के. एस. खाडे, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन कार्यालयीन अधीक्षक सुभाष घोगरे व कालिदास आवाड यांनी केले. तर आभार सुधीर गेंगे-पाटील यांनी मानले.