जपतलाई अनुदानित आश्रम शाळेत नागपंचमी साजरी…

 

धानोरा तालुका प्रतिनिधी

भाविक करमनकर 

        अनुदानित आश्रम शाळा जपतलाई येथे आज दिनांक २१/८/२०२३रोज सोमवारला शाळेच्या सभागृहात नागाच्या प्रतिमेची विधिवत पूजा करून नाग सापाची माहिती देवुन नागपंचमी सण साजरा करण्यात आला.

        धानोरा पासुन ९कि.मी.अंतरावरील जपतलाई येथिल अनुदानित आश्रम शाळेत ताटपल्लिवार मुख्याध्यापक यांच्या अध्यक्षतेखाली नागपंचमी सण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पदवीधर शिक्षक उरकुडे सर उपस्थित होते.अध्यक्षानी सापाबद्ल सविस्तर मार्गदर्शन केले.सापा पासुन मानवाला होणारे फायदे,विशारी व बिनविषारी साप कोणते याबाबत शाळेतील विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक बि.आर.भोयर सर यांनी केले तर संचालन चिलमवार मँडम कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील कर्मचारी कमलेश राखडे,दंडिकवार,तानाबाई मुंडके, खोब्रागडे आदि नि सहकार्य केले.