आळंदीत अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता…

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

आळंदी : येथील संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांच्या किर्तन सेवा व गायकांच्या भजन सेवा संपन्न झाल्या असे संयोजक हभप अरुण महाराज बडगुजर यांनी सांगितले. या सप्ताहाचा शुभारंभ उद्योजक प्रकाशशेठ पानसरे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, तुकाराम माने सरकार, शिरीष कारेकर, ज्ञानेश्वर माऊली करंजीकर, जनार्दन पितळे, विठ्ठल शिंदे, पुरुषोत्तम महाराज हिंगणकर, डॉ.सुनिल वाघमारे, विशाल महाराज देशमुख उपस्थित होते. या अखंड हरिनाम सप्ताहात हरिपाठ, सकाळ व संध्याकाळ अशा दोन सत्रात किर्तनसेवा आणि रात्री भजनसेवा संपन्न झाल्या.

       अखंड हरिनाम सप्ताहात हभप बाळासाहेब महाराज शेवाळे, गोविंद महाराज गोरे, उमेश महाराज बागडे, समाधान महाराज शर्मा, ज्ञानेश्वर महाराज शिंदे, उल्हास महाराज सुर्यवंशी, ज्ञानेश्वर महाराज करंजीकर, अक्रुर महाराज साखरे, ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, ज्ञानेश्वर महाराज कुऱ्हाडे यांच्या सुश्राव्य किर्तनसेवा संपन्न झाली रात्री ९ ते ११ यावेळेत पंडित कल्याणजी गायकवाड गुरुजी, कौस्तुभ गायकवाड, कंठभुषण संतोष गिरी महाराज, हभप ज्ञानेश्वर महाराज मेश्राम, रेखाताई मानवतकर आणि उध्दव महाराज शिंदे यांच्या भजनसेवा संपन्न झाल्या तसेच या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता हभप बापूसाहेब महाराज मोरे देहूकर यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली.