महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे चिमूर तालुका संघटक विलास मोहिनकर यांच्यावर प्रशासकिय यंत्रणेचा रोष का? — नागरिकांच्या हितार्थ व नागरिकांच्या रक्षणार्थ प्रशासकीय यंत्रणा व पत्रकारांत समन्वय असणे आवश्यक… — प्रासंगिक…

 

प्रदीप रामटेके 

मुख्य संपादक 

तथा विदर्भ उपाध्यक्ष-महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई…

        विलास मोहिनकर हे पत्रकारिता क्षेत्राबरोबर राजकीय व सामाजिक क्षेत्रात संवेदनशील पणे कार्यरत आहेत.

           देशाचा जबाबदार नागरिक या नात्याने विलास मोहिनकर यांना वाटतय शासकीय व प्रशासकीय यंत्रणा अंतर्गत अधिकाऱ्यांनी चुकिचा पायंडा पाडून घेऊ नये व चुकिच्या पायंड्यामुळे शासनास आर्थिक भुर्दंड पडू नये किंवा शासन-प्रशासन,नागरिकांचे कुठल्याही प्रकारचे इतर नुकसान होवू नये.तद्वतच कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसोबत अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारपुर्वक बोलले पाहिजे व नागरिकांचे कार्यालयीन कामे वेळेत निकाली काढले पाहिजे.

          कामाची कार्यपद्धत व कामाची कायदेशीर प्रक्रिया शेकडा ९५ टक्के नागरिकांना अजूनही अवगत नाही.यामुळे अनभिज्ञ नागरिकांना कार्यालयीन कामासंबंधाने मार्गदर्शनाची,सहानुभूतीची,गरज असते.

            अशा वेळेस संबंधीत कार्यालयात आल्यावर एखाद्या नागरिकास सहाजिकच मनात येतय कि कार्यालयातील प्रमुख अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटलो तर त्यांच्या मार्गदर्शनात काम निकाली निघेल व माझी पायपीट वाचेल,वेळ वाचेल,आणि काही रुपये वाचले तर पोटाची खळगी भरण्यासाठी सदर रुपये कामात येतील.

          कार्यालयीन कामासाठी खेड्यापाड्यातून येणारे नागरिक समृध्द आहेत किंवा समजदार,अनुभवी आहेत हा समज बऱ्याच अंशी अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण करतोय व गुंतागुंतीचा ठरतोय.खेड्यातील किंवा शहरातील नागरिकांना त्यांच्या क्षमतेच्या ज्ञानानुसार कळतय.परंतू कार्यालयीन कामे निकाली काढण्यास ते पारंगत आहेत असे होत नाही.

  संभ्रम(गैरसमज,तिरस्कार,द्वेष.) व गुंतागुंती(वेळ नाही असे कृतीतून दाखवने.) हे दोन शब्द जेव्हा एकमेकांच्या विरुद्ध गैरसमज निर्माण करतात तेव्हा याच दोन शब्दातंर्गत एकमेकांविषयी द्वेष व तिरस्कारनिय भावना पुढे येतात किंवा प्रकट केल्या जातात.

           याच्यात नुकसान सद्विवेकबुद्धिचे,विनयशीलतेचे,कर्तव्याचे,जागरुकतेचे,सतर्कतेचे,समजदारपणाचे व संवेदनशीलतेचे होते याकडे अधिकारी,कर्मचारी,नागरिक,पत्रकार,लोकप्रतिनिधी,लक्ष देण्यास हतबलता दाखवितात तेव्हा त्यांच्या कर्तव्य धर्माचा सरळ पराभव होतोय,याकडे कुणाचेच लक्ष जात नाही.

             महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे चिमूर तालुका संघटक व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे चिमूर तालुका सरचिटणीस विलास मोहिनकर याच्या विरोधात चिमूर तालुक्यातील दोन अधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशन चिमूर येथे बातम्या प्रकाशित संबंधाने तक्रारी दिल्याने ते खरोखरच कर्तव्यहिन व नासमजदार आहेत काय?याचबरोबर ते उध्दट व विकृत स्वभावाचे आहेत काय?हा प्रश्न चिमूर तालुक्यातील लोकप्रतिनिधी,समाजसेवक,अधिकारी,कर्मचारी,व समस्त नागरिकांना करतो आहे. 

             विलास मोहिनकर हे समजदार,शांत,विनयशील,आहेत व अभ्यासू वृत्तीचे दक्ष पत्रकार आहेत असे चिमूर तालुक्यातील नागरिकांचे म्हणणे असल्याचे दिसून आले.

              बातम्या प्रिंट करताना कधी कधी एखादा शब्द चुकतोय.परंतु सरसकट बातमीला चूक म्हणणे योग्य असते काय?

           लोकशाही गणराज्य शासन काळात पत्रकार समाजाचा आरसा असतो म्हणजे काय?तर पत्रकार हा जनहितार्थ कामासाठी व कार्यासाठी बातम्यांच्या वेगवेगळ्या अंगाद्वारे शासन-प्रशासनास सातत्याने न डगमगता सहकार्य करतो असे होय.

           धैर्यबाज असलेल्या पत्रकारांच्या कर्तव्यांची जाणीव सर्वांनाच आहे.म्हणूनच शासन-प्रशासन व पत्रकार यांच्यात नेहमी समन्वय असणे आवश्यक आहे या मताचा मी तरी आहे.

              पत्रकार व शासकीय – प्रशासकीय यंत्रणा यांच्यात वितुष्ट आले तर अनेकांना गंभीर समस्यातंर्गत पुढे जावे लागते हे अनेक घटनाक्रमांवरुन पुढे आले आहे व येत राहिल.

          यामुळेच नागरिकांचे हित लक्षात घेता चिमूर तालुका अंतर्गत पत्रकार विरुद्ध प्रशासकीय – शासकीय यंत्रणा असा संघर्ष परवडणारा नाही. 

            चूक सर्वांचीच होते.मात्र बाहु एखाद्या प्रकरणातंर्गत केल्या जातो हेही तेवढेच खरे आहे.

           तद्वतच पत्रकारांनी योग्य व प्रभावी बातम्या प्रकाशित केल्याच पाहिजे या संबंधाने हरकत कुणाचीही राहात नाही हे सुद्धा तितकेच खरे आहे.

               भ्रष्टाचार केला हा आरोप शब्द!”तर,भ्रष्टाचारी हा आरोप शिध्द झालेला शब्द याच्यात जसा फरक आहे तसाच तमाशा व तमशा करणेवाले यांच्यात आहे.तमाशा करणे म्हणजे अयोग्य कृती करणे असे समाज मन आहे.तर दुसरीकडे तमाशा करणेवाले मनोरंजन करतात असे होय.परंतू मनोरंजन हे हिताचे आहे की अहिताचे आहे या बाबत पारख सर्वांना आहे असे मुळीच नाही. 

        तात्पर्य असे की आयुष्याच्या प्रत्येक वळणावर समज व गैरसमज या बाबतीत दोन्ही बाजू जवळून समजून घेणे अनिवार्य आहे,तरच ठिकठाक!.