माकडाची शिकार व कालवडीवर हल्ला करीत मादी बिबट बछड्यासह जंगलाच्या दिशेने…

 

युवराज डोंगरे/खल्लार

    उपसंपादक

       नजिकच्या चिंचोली शिंगणे व एकलारा येथील दोन जणांवर हल्ला करुन जखमी करणाऱ्या मादी बिबटविषयी नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वनविभागाने सक्रिय होत मादी बिबट व बछड्याच्या शोधात पथक पथक तयार केले.

       चिंचोली शिंगणे व एकलारा येथील दोन जणांना बिबटने दि 18 जूनला हल्ला करुन जखमी केले होते.या घटनेनंतर मादी बिबटने 20 जुनला साखरी कसबेगव्हान शेतशिवारात माकडाची शिकार केली होती. तर 21जुनला इसापूर श्यामपूर परिसरात बिबटचे पगमार्ग दिसून आले होते. आज 22 जुनला कोकर्डा फाट्यावर कालवडीवर हल्ला करीत जखमी केले.

      या घटनेचा पंचनामा वनविभागाने करुन कालवडीस उपचारासाठी पशुचिकित्सालयात पाठविले या घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

      वनविभागाने 12 कर्मचाऱ्यांचे 2 पथक मादी बिबटसह बछड्याचा शोध घेण्यात सक्रिय आहेत. कोकर्डा येथील घटनास्थळावरील पुराव्यावरुन मादी बिबट हे बछड्यासोबत असल्याचे निष्फन्न झाले असून या घटनेनंतर मादी बिबट हे बछड्यासह जंगलाच्या दिशेने मार्गक्रमण करीत असल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला असून सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.