पद कुठलंही असो माऊलीकडे आलेला प्रत्येक व्यक्ती हा वारकरी आहे.:- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस… — देवेंद्र फडणवीस यांनी माऊलींच्या पालखी रथाचे केले सारथ्य… 

 

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

फलटण : माऊलींच्या रथाचे सारथ्य करण्याचे भाग्य मला मिळालं हा माझ्यासाठी भाग्याचा दिवस आहे, पद कुठलंही असो माऊलीकडे आलेला प्रत्येक व्यक्ती हा वारकरी आहे, तो मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री असो अथवा साधा माणूस असो हे सगळे वारकरीच आहे, हीच खरी माऊलींची पुण्याई आहे, या सोहळ्यात सहभागी झाल्याचा आत्मिक आनंद आहे वारीत चालणारा वारकरी हा खरच पुण्यवान आहे यांच थोडं पुण्य आपल्याला सुध्दा मिळते आपल्या मनात जे जे असते ते माऊली करत असते माऊलीकडे काय मागयच नसतं आशिर्वाद मागितला असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात व्यक्त केले.

      सातारा दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटण ते बरड मार्गावर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होऊन माऊलींच्या पालखीचे दर्शन घेतले तसेच काही वेळ संत ज्ञानेश्वर महाराज पालखी रथाचे सारथ्य केले. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर, आमदार प्रवीण दरेकर, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, हभप चैतन्य महाराज लोंढे, हभप संजय महाराज घुंडरे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर उपस्थित होते.