Home Vidarbha मागासवर्गीय आयोगाने घेतला गडचिरोली जिल्ह्याचा आढावा.

मागासवर्गीय आयोगाने घेतला गडचिरोली जिल्ह्याचा आढावा.

डॉ.जगदीश वेन्नम

  संपादक

दिनांक 22 जून रोजी मागासवर्गीय आयोगातील सदस्य श्री. चंदलाल मेश्राम निवृत्त न्यायाधीश ,तसेच श्री. किल्लारीकर वकील उच्च न्यायालय यांनी वडसा येथे भेट दिली आणि येथील विश्रामगृहात जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचा आढावा घेतला.

       यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.राजेंद्र भुयार ,श्री. देवसुदन धारगावे उपायुक्त जात प्रमाणपत्र पडताळणी समिती , डॉ.सचिन मडावी सहाय्यक आयुक्त ,समाज कल्याण विभाग , उपविभागीय अधिकारी श्री. लोंढे ,तहसीलदार श्रीमती चौधरी ,पोलिस निरीक्षक श्री.रासकर , मुख्याधिकारी श्री. रामटेके , श्री. पाटील गटविकास अधिकारी हे उपस्थित होते. यावेळी मागासवर्गीय योजना लोकांपर्यंत पोहचविण्याचे आणि जनजागृती करावी असे निर्देश दिले.