राजेंद्र रामटेके
विशेष प्रतिनिधी
डॉ.धर्मरावबाबा आत्राम माजी मंत्री यांचे मार्गदर्शनात कुरखेडा येथील सार्वजनिक बांधकामाच्या रेस्ट हाऊस मध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक आगामी जी.प व प. स. निवडणुकीच्या संदर्भाने घेण्यात आली.
त्यात अध्यक्षीय भाषणात रवींद्र वासेकर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गडचिरोली यांनी आवाहन केले की कुरखेडा तालुका हा आदिवासी बहुल व डोंगर दऱ्यामध्ये पसरलेला असून सर्वाधिक आदिवासी लोकसंख्येने अग्रगण्य आहे म्हणून या कुरखेडा तालुक्याची धुरा आदिवासी युवकाच्या हातात देऊन या तालुक्यातील तळागाळातील आदिवासींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वोतोपरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रयत्नशील आहे.
आज पर्यंत या तालुक्यात सिंचन आरोग्य रस्ते व इतरही बाबींकडे लक्ष वेधण्यासाठी या तालुक्यातील आदिवासींच्या हातामध्ये सत्ता देऊन ती समाजाभिमुख कार्य करण्यासाठी प्रेरित करणार असे प्रतिपादन रवींद्र वासेकर यांनी आयोजित कुरखेडा तालुक्यातील आढावा बैठकी मध्ये केले.
या बैठकीत जिल्हा कार्यकारी अध्यक्ष नंदूभाऊ नरोटे, युनिस भाई शेख , सभापती पिंकू भाऊ बावणे, डॉ. सोनाली ताई कोवे , सुनील नंदनवार , बी टी शेलोकर किशोर तलमले अयुब भाई पठाण, माझी सभापती दौलत कुमोठी, राजेंद्र रामटेके व तालुक्यातील ग्रामसभा व आदिवासी समाजाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते संचालन व आभार मोहन पुराम यांनी केले.



