दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : रवींद्र चव्हाण (प्रदेशाध्यक्ष) व राजेश पांडे (प्रदेश महामंत्री) यांच्या सूचनेनुसार भारतीय जनता पक्षाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय कार्यकर्ता प्रशिक्षण अभियानांतर्गत पुणे जिल्हा उत्तर या संघटनात्मक जिल्ह्यातील मंडलस्तरीय कार्यशाळांसाठी नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
या अंतर्गत आळंदी शहर मंडल प्रभारी म्हणून भाजपा जिल्हा सचिव किरण येळवंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्ष संघटन बळकटीकरण, कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण आणि प्रभावी संवाद कौशल्य विकास या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे.
किरण येळवंडे यांच्या नियुक्तीमुळे आळंदी शहर मंडलात कार्यकर्ता प्रशिक्षण उपक्रम अधिक सक्षमपणे राबविले जातील, असा विश्वास पक्ष पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तसेच, आगामी कार्यशाळांमधून स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन व संघटनात्मक दिशा मिळणार असल्याचेही सांगण्यात आले.



