शिलादेवी येथे राष्ट्रीय आदर्श विद्यालय तर्फे जागतिक वनदिनच्या निमिताने वन व वनउपज या विषयावर सर्वेक्षण…

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधि पारशिवणी 

             पारशिवनी:- राष्ट्रीय आदर्श विद्यालय नवेगाव खैरी आणि बनयान ट्री फाऊंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित उपक्रमांतर्गत राष्ट्रीय आदर्श विद्यालय शिक्षण मंडळ रामटेकचे सचिव यांचे मार्गदर्शनाखाली शनिवार, दिनांक २१ मार्चला दुपारी १२ ते ४ वाजेदरम्यान जागतिक वन दिना च्या निमिताने वन आणि वनातील उपज या विषयावर पेंच व्याघ्र प्रकल्पातील शिलादेवी गांव येथे सर्वेक्षण करण्यात आले.

               याप्रसंगी शाळेतील राष्ट्रीय हरित सेनेचे मार्गदर्शक शिक्षक साक्षोधन कडबे, हरित सेनेचे निसर्गदूत सक्षम सोनेकर, अंश बगमारे, नयन सोनटक्के, प्रणय उईके, अनुश मेश्राम यांनी प्रश्र्नावलीच्या माध्यमातून लोकांकडून जंगलातील वापरण्यात येणाऱ्या वनउपजांची माहिती संकलित केली.

           जागतिक वन दिनच्या दिवसी या उपक्रमाला यशस्विते करण्या साठी शिलादेवी गावातील सर्व ग्रामस्थांनी सहकार्य केल्याबद्दल राष्ट्रीय आदर्श विद्यालय  नवेगाव खैरी आणि बनयान ट्री फाऊंडेशन यांचे संयोजक साक्षोधन कडबे यांनी सर्वांचे आभार मानले.