एन.जागतिक मानवाधिकार संघटनेच्या विदर्भ सह संघटक पदी निलय झोडे यांची नियुक्ती…

     शेखर इसापूरे

 विभागीय प्रतिनिधी नागपूर

       दखल न्यूज भारत 

       साकोली -एन जागतिक मानवाधिकार संघटनेच्या विदर्भ सह संघटक पदी निलय झोडे यांची नियुक्ती करण्यात आली.

            नागपूर येथे 17 मार्चला आयोजित संमेलनात राष्ट्रीय अध्यक्ष पांडुरंग नरवाडे ,राष्ट्रीय सरचिटणीस बुधराव कोटणाके, विदर्भ कार्यकारी अध्यक्ष प्रदीप रामटेके यांच्या उपस्थितीत नीलय झोडे यांची विदर्भ सह संघटक पदी नियुक्ती करण्यात आली. तसेच यांना नियुक्तीपत्र व संविधान प्रत देऊन सत्कार करण्यात आला.

         यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष पांडुरंग नरवाडे, राष्ट्रीय सरचिटणीस बुधराव कोटणाके, विदर्भ कार्यकारी अध्यक्ष प्रदीप रामटेके, राज्य उपाध्यक्ष अभिजीत शेज्वल, सरचिटणीस प्रदीप शेंडे, दर्शनाताई मेश्राम व विदर्भातील अनेक जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.