एन.जागतिक मानवाधिकार संघटनेच्या विदर्भ सचिव पदी शेखर इसापूरे यांची नियुक्ती…

      निलय झोडे

विभागीय प्रतिनिधी नागपूर

       दखल न्यूज भारत 

साकोली -एन जागतिक मानवाधिकार संघटनेच्या विदर्भ सचिव शेखर इसापूरे समावेश करण्यात आला.

    नागपूर येथे 17 मार्चला आयोजित संमेलनात राष्ट्रीय अध्यक्ष पांडुरंग नरवाडे ,राष्ट्रीय सरचिटणीस बुधराव कोटणाके, विदर्भ कार्यकारी अध्यक्ष प्रदीप रामटेके सर यांच्या उपस्थितीत शेखर ईसापुरे विदर्भ सचिव, पदी नियुक्ती करण्यात आली. तसेच यांना नियुक्तीपत्र व संविधान प्रत देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष पांडुरंग नरवाडे, राष्ट्रीय सरचिटणीस बुधराव कोटणाके, विदर्भ कार्यकारी अध्यक्ष प्रदीप रामटेके, राज्य उपाध्यक्ष अभिजीत शेज्वल, सरचिटणीस प्रदीप शेंडे, दर्शनाताई मेश्राम व विदर्भातील अनेक जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.