लाखनीतील राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय माध्यमिक विभागात तालुक्यातून द्वितीय… — मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत मूल्यांकन’…

  चेतक हत्तीमारे 

जिल्हा प्रतिनिधी भंडारा

          राष्ट्रीय शिक्षण संस्था द्वारा संचालित लाखनी येथील राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालयाने लाखनी तालुक्यातील द्वितीय क्रमांक पटकावला असून दोन लाखाचे पारितोषिक महाराष्ट्र शासनाकडून दिल्या जाणार आहे.

            श्रद्धेय बापूसाहेब लाखनीकर यांच्या विचारातून निर्माण झालेली राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय ची स्थापना 1967 या वर्षात करण्यात आली मुलींना स्वतःचा विचार स्वतःचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मुलींसाठी स्वतंत्र शाळा उघडण्यात आली. वर्ग पाच ते दहावी पर्यंत येथे वर्ग आहेत भौतिक सुविधा संसाधने उपलब्ध आहेत.

             क्रीडा स्पर्धेतही विद्यालय राज्यस्तरापर्यंत पोहोचले आहे येथील विद्यार्थिनींनी देश विदेशात आजही मोठ्या पदावर पोहोचल्या आहेत. विद्यालयातील शिस्त स्वच्छ परिसर आणि शैक्षणिक दर्जा सुयोग्य आहे.

             शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ.सौ मीरा विजय बारई आणि शाळेतील शिक्षक विलास गायधनी, मन्साराम नाकाडे, विनोद कावळे, ब्रह्मा खंडाईत, होमेश्वर गोमासे, गोपाल चाचेरे, सौ सुनीता खंडाईत, निधी खेडीकर, प्रीती पाटील, माधुरी लाडे, कल्पना गायधनी, शारदा कानतोडे, रेखा घावळे, राजश्री चव्हाण या सर्वांचे सहकार्य लाभले.

             केंद्रप्रमुख सुनिता मरस कोल्हे गटशिक्षणाधिकारी सुभाषजी बावनकुळे तसेच राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आल्हाद भांडारकर या सर्वांनी कौतुक केले.