व्याहाड खुर्द येथे हळदी कुंकूवाच्या माध्यमातून महिला मेळावा… — कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक निखिलभाऊ सुरमवार यांच्या सामाजिक व नावीन्यपूर्ण उपक्रम…

     सुधाकर दुधे

सावली तालुका प्रतिनिधी 

           मकरसंक्रांतीच्या पर्वावर तालुक्यातील मौजा.व्याहाड खुर्द येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व युवक काँग्रेस कार्यकर्ता निखिलभाऊ सुरमवार यांच्या संकल्पनेतून महिलाकरिता महिला मेळाव्याचे आयोजन करून हळदी कुंकू तसेच भेट वस्तू देऊन कार्यक्रम साजरा करण्यात आला.

             मेळाव्याचे उदघाटन राज्याचे विरोधी पक्षनेते तथा सावली ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या अर्थांगिनी सौ.किरणताई वडेट्टीवार व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस आद.शिवानीताई वडेट्टीवार यांच्या हस्ते पार पडले.प्रमुख उपस्थित म्हणून सावली तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सौ.उषाताई भोयर,व्याहाड खुर्दच्या सरपंचा सौ.सुनीता उरकुडे, सावलीच्या नगराध्यक्षा सौ.लताताई लाकडे,सौ.रुचाताई सुरमवार,हिरापूरच्या सरपंच सौ.प्रीती गोहने,कापसीच्या सरपंच सौ.सुनीता काचीनवार,निमगावच्या सरपंच सौ.गीता लाकडे,केरोडाच्या सरपंच सौ.नर्मदा चलाख,उपरीच्या सरपंच सौ.कुमुद सातपुते,मोखाळ्याचे सरपंच सौ.प्रणिता म्हशाखेत्री,सावली शहराध्यक्षा सौ.भारती चौधरी,तसेच जेष्ठ काँग्रेस कार्यकर्त्या सौ.कविता मुत्यालवार तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती सिंदेवाहीच्या संचालिका सौ.जयश्री नागापुरे आदी उपस्थित होते.

            सर्वप्रथम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली तसेंच महिलांना हळद कुंकू लावून भेटवस्तू देण्यात आले.

          कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सौ.अनुसया भरडकर,सौ.वैशाली सहारे,सौ.रुपाली कांबळे,सौ.सोनी टोगे,सौ.मीना म्हस्के,सौ.जराते मॅडम आदी महिलांनी विशेष सहकार्य केले.