तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचे सेक्रेड हार्ट स्कूल करंभाड येथे आयोजन.

    कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

         पारशिवनी:- पंचायत समिती पारशिवनी अंतर्गत येणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्यांचा आणि कलात्मक गुणांचा विकास व्हावा या उद्देशाने पारशिवनी तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव-२०२३-२४ आयोजित करण्यात आलेला आहे.

        या प्रसंगी उद्घाटन समारंभ आज

मंगळवार,२३ जानेवारी २०२४ सकाळी १०.०० वाजता होणार असून क्रिडा स्पर्धाचे उद्घाटक अँड.आशीष जयस्वाल आमदार रामटेक विधानसभा क्षेत्र हे असणार आहेत तर समारंभाचे अध्यक्ष सौ.मुक्ताताई कोकड्डे अध्यक्षा जिल्हा परिषद नागपूर असणार आहेत.

         कार्यक्रमाला विशेष अतिथी

कु.कुंदाताई राऊत उपाध्यक्षा जिल्हा परिषद नागपूर,श्री.राजकुमार कुसुंबे सभापती शिक्षण व अर्थ समिती जि.प. नागपुर,सौ.मंगलाताई उमराव निबोने सभापती पं.स. पारशिवनी,प्रमुख अतिथी सौ.अर्चना दिपक भोयर जि.प. सदस्या करभाड़,करूणाताई भोवते उपसभापती,पं.स.पारशिवनी,सौ. रश्मीताई बर्वे सदस्या जि.प. नागपूर,श्री.व्यंकट कारेमोरे सदस्य जि.प. नागपूर,श्री.चेतन देशमुख सदस्य पं.स. पारशिवनी,श्री.संदीप भलावी सदस्य पं.स.पारशिवनी,श्री. नरेश मेश्राम सदस्य पं.स. पारशिवनी,सौ.मिनाताई प्रफुल्ल कावळे सदस्या पं.स. पारशिवनी,सौ. तुलसीताई दियेवार सदस्या पं.स. पारशिवनी,सौ.निकीताताई सिताराम भारद्वाज सदस्या पं.स.पारशिवनी हे उपस्थित राहणार आहेत.

          सिस्टर स्वाती खलखो प्राचार्या सेक्रेड हार्ट स्कूल करंभाड यांचे उपस्थितीत उदघाटन सोहळा होणार आहे श.यानंतर तालुका स्तरिय क्रिडा स्पर्धांना प्रारंभ होणार अशी माहीता पंचायत समितीचे बिडिओ सुभाष जाधव आणि तालुका शिक्षण अधिकारी कैलाश लोखंडे यांनी दिली.