दर्यापूर येथे तालुका क्रीडा महोत्सव संपन्न…

युवराज डोंगरे/खल्लार 

          उपसंपादक 

            पंचायत समिती दर्यापूर, अंतर्गत दर्यापूर शिक्षण विभाग‌ द्वारा तालुका क्रीडा संकुल दर्यापूर येथे तालुकास्तरीय शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव सन २०२३-२४ चे आमदार बळवंत वानखडे यांनी उद्घाटन केले व विद्यार्थ्यांना या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्यात.

           यावेळी प्रमुख्याने विनोद खेडकर , प्रशासक तथा गटविकास अधिकारी, पं. स., दर्यापूर , मनोज लोणारकर,उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कार्यालय, दर्यापूर, डॉ रविंद्रकुमार कानडजे, तहसिलदार, तहसिल कार्यालय, दर्यापूर , विनोद खेडकर गटविकास अधिकारी, डी सी गायकवाड, गट शिक्षणाधिकारी तसेच सर्व केंद्र प्रमुख, सर्व संघटनेचे पदाधिकारी तसेच इतर सन्माननीय पाहुणे व तालुक्यातील विविध शाळांचे विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी वृंद या कार्यक्रमास उपस्थित होते.