फोन कॉल करुन त्रास देणाऱ्यांना भरावा लागेल ५० हजारांचा दंड.. — नवीन नियम.

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे

       वृत्त संपादीका 

           आजच्या स्थितीत फोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे.आपला नंबर चुकीच्या व्यक्तीकडे गेला तर आपल्याला वारंवार फोन करुन त्रासही दिला जातो.अशा लोकांसाठी केंद्र सरकारने नवा नियम आणला आहे.

        विनाकारण फोन करुन तुम्हाला कोण त्रास देत असतील तर ५० हजारांपासून २ लाखांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो. 

          केंद्राच्या सरकारकडून नवीन टेलिकॉम बिल आणले गेले आहे.ज्यामध्ये विविध नियमांचे उल्लंघन केल्यास ५० हजार रुपयांपासून २ लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाईल अशी तरतूद करण्यात आली आहे.

        देशातील नागरिक नको असलेल्या कॉल्समुळे त्रासलेले असतील,तर त्यांच्यासाठी दिलासादायक टेलिकॉम विधेयक आहे.गेल्या काही वर्षांत नको असलेल्या कॉलच्या संख्येत वाढ झाली आहे.यात प्रमोशन आणि बँक कॉलमध्ये वाढ झाली आहे.यासाठी ट्रायने अनेक सूचना दिल्या आहेत. 

         मात्र,दूरसंचार कंपन्यांकडून कोणतीही ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत.अशा परिस्थितीत सरकारने कठोरपणा दाखवत नव्या टेलिकॉम बिलमध्ये दंडाची तरतूद केली आहे. 

       नवीन बिलामुळे नको असलेल्या कॉल्सपासून नागरिकांची सुटका होण्याची शक्यता आहे. 

         ग्राहकांवरील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडाची रक्कम वाढवण्यात आली आहे.तसेच ओटीटीसाठी नियमही निश्चित करण्यात आले आहेत.