दामोधर रामटेके
कार्यकारी संपादक
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वतःला घडवताना येणारे प्रसंग बरेच अनुभव देतात आणि संवेदनशील व्यक्तीला कार्यक्षम बनवितात,याबाबतचे ज्वलंत उदाहरण म्हणजे दखल न्यूज भारत चे मुख्य कार्यकारी संपादक,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे चिमूर तालुका सहसंघटक,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य तथा चिमूर तालुक्यातील मौजा कोटगाव ग्रामपंचायतचे सदस्य उपक्षम रामटेके होत..

उपक्षम रामटेके हे एक कर्तव्यशिल व्यक्तीमत्व असल्याने त्यांची कर्तबगारी सातत्याने लोकहितासाठी असल्याचे आतापर्यंतच्या त्यांच्या वाटचालीवरुन दिसून आले आहे.
कठीण प्रसंगात आणि कार्यालयीन कामकाजात गोरगरिब नागरिकांना मदत करणे,हा त्यांचा महत्त्वाचा गुणधर्म आहे!..
उच्चशिक्षित असताना शिक्षणाचा आव न आणता सर्वसामान्य नागरिकांसोबत नेहमी मित्रत्वाचे संबंध ठेवणे आणि मनमिळावू स्वभावातंर्गत सर्वांचा मान राखणे,ही त्यांच्या कर्तव्यातील विशेष भुमिका आहे.
दखल न्यूज भारतचे मुख्य कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळताना त्यांनी बातम्यांच्या माध्यमातून सामाजिक न्यायाला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे.
याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य म्हणून जबाबदारी सांभाळताना त्यांनी गावातील नागरिकांच्या समस्यांकडे विशेष लक्ष देत मासिक मिटींगमध्ये अनेकदा चर्चा घडवून आणली.
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे काम सुध्दा वरिष्ठांच्या सुचनेनुसार दक्ष होत वेळेत पार पाडले आहे.भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते डॉ.सतीश वारजूकर यांच्या अगदी जवळचे असल्याचे लक्षात आले आहे.
मुख्य कार्यकारी संपादक हे एखाद्या प्रकाशनाच्या (उदा. वृत्तपत्र, मासिक) संपादकीय विभागाचे सर्वोच्च अधिकारी असतात.ते प्रकाशनाची धोरणे ठरवतात,संपादकीय संघाचे नेतृत्व करतात आणि सर्व मजकूर व्यावसायिक मानकांनुसार आहे याची खात्री करतात.
त्यांच्याकडे संपूर्ण संपादकीय कार्याची अंतिम जबाबदारी आहे.मुख्य कार्यकारी संपादकाची प्रमुख जबाबदारी धोरण आणि दिशा ठरविण्यासाठी आहे.
मुख्य कार्यकारी संपादकाची भूमिका ही संपादकीय कार्याचा केंद्रबिंदू असते,जी प्रकाशनाच्या यशासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
उपक्षम रामटेके हे कर्तव्यदक्ष,कार्यक्षम असल्याने ते चौकस असतात.त्यांचा ध्येयवाद हा उघड होत नसल्याने कर्तव्यानुसारच ते समाजापुढे समोर येत असतात असेही दिसून आले आहे.
मात्र,उपक्षम रामटेके यांचे हेव्याचे व द्वेषाचे मन नसल्याने ते आपल्या आयुष्यातील ध्येयातंर्गत यशस्वी होणार असे भाकीत करायला हरकत नाही.
त्यांचा आज वाढदिवस असल्याने दखल न्यूज भारत चे,मुख्य संपादक,वृत्त संपादिका,सर्व संपादक,सर्व कार्यकारी संपादक,सर्व उपसंपादक,सर्व जिल्हा प्रतिनिधी,नागपूर विभागीय प्रतिनिधी,तालुका प्रतिनिधी,विशेष प्रतिनिधी,कोटगाव गटग्रामपंचायतचे पदाधिकारी,ग्रामसेवक,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,सहकारी मित्र,आई-वडील,ताई-भाऊजी,बडे पप्पा – बडी मंमी,काका-काकू,आत्या-मामाजी,दोन्ही मामा- दोन्ही मामी,मेव्हूनभाऊ,सर्व भाऊ,सर्व ताई,आप्तपरिवारातील सदस्य,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे चिमूर तालुका पदाधिकारी यांनी,”उपक्षम रामटेके यांना भरभरून हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत व उज्ज्वल भविष्यास्यासह दिर्घायुष्यासाठी मनोकामना केली आहे…



