आपली माय किंवा आई ( मम्मी नाही ) जेंव्हा शेताला, बाजारला किंवा गावाला चालत जाताना आपल्या पोटाशी म्हणजे हृदयाशी बिलगून लेकराला कडेवर घेऊन चालत असते. म्हणून बाळ आणि आई व माय आणि लेकरू यांचा अती घनिष्ठ संबंध कुणीही याला तोडू शकत नाही.
अगदी याप्रमाणेच जेंव्हा बाप आपल्या पोराला खांद्यावर घेऊन रस्त्याने चालत असतो. तेंव्हा याचा अर्थ हा आहे कीं, बापाची दूर बघून चालण्याची दूरदृष्टी जेवढी असते. त्यापेक्षा जास्त लांब दूरदृष्टी लेकाची असावी म्हणून बाप लेकराला खांद्यावर घेऊन चालत असतो. आणि बापापेक्षाही लांब लेकराने बघितले पाहिजे……
आज आम्ही ( आजची पिढी ) किती वरील सू-संस्कारातून घडलो आहोत. याचे आत्मचिंतन स्वतः केले पाहिजे. आजची पन्नाशी गाठलेली पिढीच केवळ या संस्कारातून गेल्याने ही जाणीव आहे की निदान सामाजिक भान जपून आहे आणि टिकून आहे.
दुसरे असे की, आमची ( पन्नाशी गाठलेली, गाठत आलेली, जवळच गाठात येणारी आणि त्याच्यावरची ) पिढी जन्मादात्या माता – पित्याच्या वरीलप्रकाराच्या सुसंस्कारातून घडल्या गेल्यानेच आम्ही आमच्या आदर्श महापुरुषांना आमचे आई-बाप समजून त्यांच्या क्रांत्या टिकवून ठेवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करत आहोत.
समोरची संविधानविरोधी शक्ती कितीही बलाढ्य व सत्ताधारी असुद्या………
परंतू , जन्मदात्याच्या वरील सुसंस्कारामुळे मिळालेल्या आदर्श महापुरुषांच्या वैचारिक क्रांतीने मिळालेल्या महान……
आत्मविश्वासापुढे अगदी छोटीशी बनून जाते……!
म्हणूनच आमचे दोन माय – बाप आहेत. एक जन्म – दाते आणि दुसरे आदर्श महापुरुष आणि तत्ववेत्ते (देव किंवा ईश्वर नव्हे)…….


