Home देशविदेश छलकपट, दांभिकता, दगा फटका, विश्वासघात हाच विषमता वाद्यांचा स्थायीभाव…

छलकपट, दांभिकता, दगा फटका, विश्वासघात हाच विषमता वाद्यांचा स्थायीभाव…

           विषमतावादी विचाराचे लोक हे अहंकारी असतात, त्यांच्या मेंदूत प्रचंड गर्व ठासून भरलेला असतो. यामुळेच वर्चस्व, श्रेष्ठत्व, उच्चनीचता, भेदभाव, असमानता अशा अशा प्रकारचे वर्तन आणि व्यवहार ते करीत असतात. आपले वर्चस्व आणि श्रेष्ठत्व टिकवण्यासाठी या विषमता वाद्यांना बहुजनांचे शोषण करणे आणि त्यांच्यावर अन्याय अत्याचार करणे आवश्यक आणि महत्त्वाचे वाटते, कारण बहुजनांचे आर्थिक आणि सामाजिक शोषण केल्यामुळे त्यांना संपूर्ण समाज हा श्रीमंत बनवतो, आपला नेता बनवितो, बहुजन समाजाला लाचार आणि नोकर बनविल्यामुळे हा समाज त्यांच्या पायावर डोके ठेवतो, त्यांच्यापुढे नम्रतेने वागतो, त्यांचा गुलाम होतो, हे विषमता वाद्यांना पक्के माहीत असते, म्हणूनच विषमतावादी विचार आणि विषमतावादी व्यवस्था ही त्यांना महत्त्वाची वाटते. 

           विषमतावादी विचार टिकवायचे असतील तर त्यासाठी विषमतावादी आर्थिक आणि सामाजिक व्यवस्था असणे महत्त्वाचे असते, आणि अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी सत्ता हाती असणे अत्यंत आवश्यक असते, त्यासाठी ते सतत प्रयत्न करीत असतात. सरळ मार्गाने सत्ता आपण घेऊ शकत नाही किंवा टिकवू शकत नाही किंवा ते मिळत नाही यासाठी वाकड्या मार्गांचा ते अवलंब करतात, यासाठी छलकपट करणे, विश्वासघात करणे, खोटी आश्वासने देणे, खोटे बोलणे पण रेटून बोलणे की ज्यामुळे लोकांना ते खरेच वाटले पाहिजे, दगा फटका करणे, फोडाफोडी करणे, पैशाचे आणि खुर्चीचे आम्हीच दाखवणे, दांभिकता अवलंबणे, इत्यादी हिन आणि नको त्या मार्गाचा अवलंब करून सत्ता आपल्या हाती ठेवण्याचा किंवा सत्ता घेण्याचा प्रयत्न करीत असतात. छलकपट वर्चस्व श्रेष्ठत्व भेदभाव असमानता उच्चनीचता सोशल अन्याय अत्याचार हे मुळे त्यांचे धोरण असते नव्हे हे त्यांचे शस्त्र पण असते. 

           विषमतावादी विचाराचे लोक हे अल्पसंख्या असतात, त्यांची संख्या जास्त नसते, त्यामुळे सत्ता हाती घेण्यासाठी ते लोकशाहीचा मार्ग अवलंबित नाहीत, ते संघर्ष करीत नाहीत, रस्त्यावर उतरत नाहीत, कधी उपोषण, रास्ता रोको, सत्याग्रह, मोर्चे इत्यादी आंदोलनाचा मार्ग वापरत नाहीत, कारण त्यांची संख्या कमी असते, म्हणून ते छलकपट विश्वासघात दांभिकता दगा फटका अशा हिन आणि शूद्र मार्गाचा अवलंब करतात. 

          अशा मार्गाचा अवलंब करण्याचे अजून एक कारण, ते म्हणजे ते डरपोक असतात, शिवाय शारीरिक दृष्ट्या ते बलवान नसतात, बुद्धीने आणि शरीराने पण ते कमकुवत असतात, म्हणून हे विषमतावादी जे काही करायचे आहे ते उजेडात न करता अंधारातच करीत असतात, जणू ही घुबडाची जात आहे, यांना अंधार प्रिय असतो, कारण त्यांना अंधारात दिसते, आणि उजेडात मात्र हे आंधळे होतात. बुद्धीने आणि शरीराने हे पंगू असतात, तरीपण म्हणतात ना “लंगड ते लंगडा तरी गाव खोरी पण चरेना”, म्हणजे गुणाने बसना सतत होडीपणा करत असते, या गुणाचे हे विषमतावादी विषाणू असतात. सर्व वातावरण बिघडून टाकतात, आणि समाजाला रोग लावतात. समतेचा विचार तर त्यांना शिवतच नाही, त्यापासून ते अगदी कोसो दूर असतात. बहुजन हिताय बहुजन सुखाय, हा मंत्र त्यांचा जीव घेणारा असतो, म्हणून या मंत्राचा ते द्वेष करतात. 

         विषमता वाद्यांना आर्थिक सामाजिक समता नको असते, यांना लोकशाही मान्य नाही तर हुकूमशाहीचे हे पुरस्कर्ते असतात, बहुजनांना अक्कल नसते, अशी यांची धारणा असते, याचा अर्थ या अकलेच्या कांद्यांना जणू ज्ञानाचे ठेकेदार आपणच आहोत, धर्माचे आणि शिक्षणाचे ठेकेदार पण आपणच आहोत, ज्ञान शिक्षण संपत्ती याचा अधिकार हे विषमतावादी बहुजनांना द्यायला तयार नसतात, नव्हे तर बहुजनांना हे अधिकार मिळू नयेत म्हणून आतापिटा करीत असतात, जेव्हा चे रान करीत असतात. यासाठीच यांनी देव, धर्म, दैव, पुनर्जन्म या संकल्पनांना जन्म दिला, शोधून काढल्या आणि कथा कीर्तन पुस्तके कला शिल्प याद्वारे या संकल्पनांची रुजवण केली, आणि बहुजनांना गर्दीत लोटले, नरक यातना भोगायला लावली, नव्हे अजूनही ते भोगतच आहेत गेली अडीच हजार वर्षापासून. 

         या विषमता वाद्यांनी आधी वैदिक ब्राह्मण धर्म तयार केला, त्यास हिंदू धर्म हे नाव दिले, त्याद्वारे बहुजनांचा ज्ञानाचा धर्माचा देवाचा शिक्षणाचा संपत्ती बाळगण्याचा अधिकार नष्ट केला आणि तो आपल्याकडेच ठेवला.. यासाठी वर्णव्यवस्था आणि जाती व्यवस्था निर्माण केली, ती रुजविली आणि राबविली, आणि ऐश करीत राहिले. पंधरा टक्के हे अभिजन 85% बहुजनांचे राजकर्ते बनले, मालक बनले, आणि बहुजनांना गुलाम केले, नोकर केले, अस्पृश्य केले, आवरण केले आणि आपण सवर्ण झाले. हे दुष्ट कृत्य या दुष्ट लोकांनी म्हणजे दुर्जनांनी केले. 

         अडीच हजार वर्षांपूर्वीचा हा एक संघ भारतीय समाज हा विघटित झाला, याचे कारण एकसंघ समाजाला फोडा तोडा त्याचे तुकडे तुकडे करा या समाजाचे चार वर्ण आणि साडेसहा हजार जातीत तुकडे करून म्हणजे एक संघ समाजाचे तुकडे करून म्हणजे फोडून, म्हणजेच त्यांची ताकद कमी करून, त्यांना जोडायचे आणि त्यांना सतत भीतीत ठेवायचे, एका जातीने दुसऱ्या जातीला नीच समजायचे, आणि खालच्या जातीने वरच्या जातीचा द्वेष करायचा, अशा प्रकारची मानसिकता भारतीय समाजा या विषमता वाद्यांनी निर्माण केली, थोडा थोडा आणि राज्य करा हे तत्व इंग्रजांचे नसून इंग्रजांनीच त्यांचे अनुकरण केले आणि वैदिक ब्राह्मण काय, अरे ब्राह्मण काय, मुघल काय, इंग्रज काय, या सर्वांनीच थोडा जोडा आणि राज्य करा या तत्त्वाचे म्हणा किंवा धोरणाचा अवलंब करून शेकडो वर्ष बहुजनांना गुलाम केले. 

          इंग्रज राजवटीत सुधारण्याचे, प्रगतीचे, विकासाचे वारे वाहू लागले, त्यातूनच फुले शाहू आंबेडकर असे महामानव जन्मास येऊन समतेच्या विचारांची रुजवन करू लागले, यामुळेच भारतातील सर्व जातीतील सर्व धर्मातील बहुसंख्य सामान्य जनता एकत्र येऊन काँग्रेस संघटनेच्या नेतृत्वाखाली लढा देऊन इंग्रजांची हुकूमशाही नष्ट करून लोकशाही स्थापन केली, आणि या लोकशाहीला मनुस्मृतीला शह देणारी भारतीय राज्यघटना बाबासाहेबांनी तयार केली, त्यानुसार म्हणजे संविधानानुसार 26 नोव्हेंबर 1950 ते 2023 पर्यंत लोकशाही चे वारे आणि समतेचे वारे आपल्या देशात वाहू लागले होते, परंतु 2024 मध्ये याच संविधानाचा आणि लोकशाहीचा मार्गाने विषमतावादी विचाराचे लोक देवाचा धर्माचा गैरवापर करून, सत्तेत घुसले, त्यांनी सत्ता काबीज केली, सत्ता हाती येतात ते निर्भीड झाले आणि म्हणायला लागले की, आम्ही संविधान बदलणार, बाबासाहेबांनी जी मनुस्मृती जाळून अगदी तिच्याविरुद्ध असलेली भारतीय राज्यघटना तयार केली ती बदलून आम्ही परत मनुस्मृतिच या देशाला लागू करणार, असे जाहीरपणे बोलण्याची ताकद या विषमतावादी लोकांमध्ये निर्माण झाली, याचे कारण म्हणजे सत्तेतील लोकांचे पाठबळ, नव्हे आज जे मोठ्या प्रमाणात खाजगीकरण होत आहे, लोकशाही संस्थांवर सरकारचे अतिक्रमण होत आहे, सरकारी उद्योग आणि सेवा भांडवलदारांना दिल्या जात आहेत, यावरून हे सिद्ध होते की, परत एकदा इथे प्रतिक्रांती झाले आहे, म्हणून परत एकदा पूर्वीसारखी गुलामी आपल्या वाट्याला येऊ नये म्हणून बहुजनांनी क्रांती करण्याची आवश्यकता आहे, नव्हे ती वेळ येऊन ठेपलेली आहे, यावेळी जर बहुजन अंधारात चाचपडत बसतील तर बहुजनांचे भविष्य अंधारातच राहील. अशी परिस्थिती आणायची नसेल तर विषमता वाद्यांचे हे छलकपट विश्वासघात दांभिकता दगा फटका यापासून सावध राहिले पाहिजे, कारण त्यांचा तो गुणधर्मच आहे, त्यात बदल होणार नाही. तो त्यांचा स्थायीभाव आहे. 

       लेखक : दत्ता तुमवाड

         सत्यशोधक समाज नांदेड

दिनांक : 21 नोव्हेंबर 2025. फोन : 9420912209.