गोगो..”चा,..झुरक्यात.. तरुणाई बेधुंद.. — शालेय अल्पवयीन मुले नशेच्या आहारी..

अमान क़ुरैशी

जिल्हा प्रतिनिधि

सिंदेवाही :-

   चंद्रपूर जिल्ह्यासह सिंदेवाही शहरातील युवा पिढी तरुण वयात गांजा,चरस,अफीम सेवनाच्या नादी लागत असल्याची सर्वत्र चर्चा आहे व हकीकत सुध्दा आहे.मात्र,आता नशेबाज तरुणांना ‘गोगो’ पेपरची भुरळ पडली आहे.या पेपरमध्ये तंबाखू किंवा अमली पदार्थ भरून झुरका ओढत नशेच्या आहारी गेले असल्याच चित्र आहे.

       शहरातील रस्त्यालगतच्या, बसस्थानक जवळील पान टपऱ्यांवर,”गोगो,नावाने पेपर विकला जातो.गोगोचे 3 पेपर्स असतात.चिलमला पर्याय म्हणून याचा वापर वाढला आहे.

          नशेचे व्यसायीकरण करुन बाजार मांडणाऱ्यांनी नशेला अधिक नफेखोर बनवण्यासाठी नव्या शक्कल लढवल्या आहेत.अशीच शक्कल लढवून तयार केला जाणारा गोगो पेपर अवघ्या १० रुपये किवा 20 रुपये किमतीत पान टपऱ्यांवर मिळत आहे.नशाकरिता वापरणाऱ्या पेपर विक्रीमुळेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह अल्पवयीन मुलेही हा,”गोगो,पेपर खरेदी करत असल्याचे टपरीचालक खासगीत सांगतात,तर काही टपरीचालक या पेपरमध्ये काही आक्षेपार्ह नसल्याचाही दावा करतात.

       राज्यात अमली पदार्थांवर कारवाई होत असली तरी ग्रामीण भागात गांजाला सर्वाधिक मागणी आहे.तो चिलममध्ये भरून ओढला जातो.मात्र,चिलम तरुणांना सहज मिळत नाही.

          त्यामुळे गांजा,चरस ओढण्यासाठी गोगो पेपर वापरण्याची नवी शक्कल नशेबाजांनी शोधून काढली आहे.गोगो पेपर सिगारेटचे कागदासारखा पातळ पेपर असून या रिकाम्या पेपरच्या आत गांजा,चरस,अफिम,भांग यांसारखे अमली पदार्थ भरले जातात.त्यानंतर या पेपरचे पुढील टोक बंद करून नशा केली जाते.

           नशेच्या आहारी गेल्याने अल्पवयातच मुलांचे आरोग्य बिघडणार आहे व शिक्षणाचे नुकसान होणार आहे.सदर व्यसनाचा नवीन प्रकार त्रासदायक होणार अशी शहरातील सुजाण नागरिकांत चर्चा सुरू आहे.

***

गोगो पेपर काय आहे ?

       पान टपरीवर गोगो पेपर 10 रुपये किमतीचा असून त्यामध्ये पातळ 3 कागद असतात.नशेली पदार्थ कागदात गुंडाळी करून सिगरेट सारखा धूर निघण्याकरिता गोगो पेपरचा उपयोग केला जातो.तद्वतच झुरक्यात.. ओढल्या जाणारा नशेचा हा प्रकार भयंकर त्रासदायक होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.