शेतातील उभे पिक गावच्या सरपंचानी मोडले.:-माजी सैनिकांचा आरोप… 

 

युवराज डोंगरे/खल्लार

    उपसंपादक 

           येथून जवळच असलेल्या महिमापूर येथील शेत शिवारातील माजी सैनिकांच्या शेतातील उभे तूर व सोयाबिनचे पिक गावच्या सरपंचानी मोडले असल्याचा आरोप माजी सैनिक यांनी केला असून त्याबाबतची तक्रार खल्लार ठाण्यात करण्यात आली आहे.

         महिमापूर येथील बाबुराव थोरात हे माजी सैनिक आहेत.मौजा महिमापूर गट नंबर 140 मधिल 5 हेक्टर 78 आर या इ-क्लास गायरान जमिनीवर मशागत करुन 2 हेक्टर 89 आर मध्ये सोयाबीन पिकाची पेरणी केली होती सदर जमीन ही मागिल 30 वर्षापासून थोरात यांच्या ताब्यात आहे.

         दि 14 ऑगस्टला मध्यरात्री वेळी महिमापूरचे सरपंच सुहास साहेबराव वाटाणे यांनी त्यांच्या स्वतःच्या ट्रॅक्टरने शेतातील उभे असलेले सोयाबिन व तुरीचे पिक मोडून टाकले दुसऱ्या दिवशी शेतात शेतातील पिक मोडले असल्याचे निदर्शनास आले याबाबतची तक्रार खल्लार पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे.