कांग्रेस-भाजपा एकाच माळेचे मनी… — म्हणुन स्वतःला रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता माना.:-मुनिश्वर बोरकर 

ऋषी सहारे

संपादक

आरमोरी:-रिपब्लिकन पार्टीत १७ गटअसले तरी चालेल स्वतःला रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता माना. कारण कांग्रेस आणि भाजपा एकच माळेचे मणी आहेत. रिपाईच्या स्थानिक नेत्यांना ते विचारात घेत नाहीत. निवडणुकीत रिपाईचे सर्व गट आपलेच आहेत या तोर्‍यात वावरतात त्यामुळे यांचीही जागा रिपाईने दाखविली पाहीजे.

        अश्या प्रकारचे परखड विचार पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी आरमोरी येथील पिरिपाच्या कार्यकर्त्या समोर मांडले. रिपब्लिकन पार्टीची आरमोरी तालुका बैठक रेस्ट हाऊस आरमोरी येथे पिरिपाचे कार्याध्यक्ष मुरलीधर भानारकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. मुनिश्रर बोरकर तर प्रमुख पाहुणे म्हणुन पिरिपाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र ठवरे. जिल्हा उपाध्यक्ष मारोती भैसारे , सचिन किरणापुरे आदि लाभले होते.

          याप्रसंगी मुरलीधर भानारकर म्हणाले की मी गडचिरोली जिल्हयातील सच्चे नेते प्रा. बोरकर सरामुळे मी लोजपातुन रिपाईत आलो आमच्या दोघांची शक्ती हीजनतेची कामे करण्यासाठी राहील जिल्हयात पक्ष वाढवू. याप्रसंगी मारोती भैसारे, सचिन किरणापूरे,राजेंद्र ठवरे यांचीही भाषणे झालीत कार्यक्रमाचे संचालन शामराव सहारे यांनी केले.

         कार्यक्रमास लोकमित्र बारसागडे, शैलाब लोखंडे, भगवान मोहीते , देवेंद्र बोदेले , प्रशांत मेश्राम , गिरिधर शेंन्डे , विजय शेन्डे पाडुरंग ढेभुर्णे , शामराव सहारे , सुभाष आंबेकर ‘ विलास भानारकर , डाकराम ढेभुर्णे , रोशन उके ‘ अनिल बाबोळे , अशोक शामकुळे प्रमोद सरदारे , नाजुक भैसारे , कृष्णा चौधरी, प्रफुल भानारकर , चरण बारसागडे आदि सहीत बहुसंख्य पिरिपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.