Home Social आयुष्यमान आरोग्य मंदिर सोनसरी येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा…

आयुष्यमान आरोग्य मंदिर सोनसरी येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा…

राजेंद्र रामटेके 

विशेष प्रतिनिधी 

          आयुष्यमान आरोग्य मंदिर सोनसरी येथे आंतरराष्ट्रीय योग सप्ताह दिनांक 16 जून ते 21 जून या कालावधीमध्ये साजरा करण्यात आला त्यानिमित्य अगोदर भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.

       शिबिरात एकूण 150 रुग्णांनी सहभाग घेतला त्यांना योग्य उपचार व मार्गदर्शन तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आले तसेच योग शिबिर सोनसरी च्या दवाखान्याच्या आवारात घेण्यात आले. त्यानिमित्ताने आंतरराष्ट्रीय योग दिवस लिहिलेले योग शिबिरात सहभागी झालेल्यांना कॅपचे वाटप करण्यात आले.तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजीता वाढीवे, डॉ. कुमुद सीडाम वैद्यकीय अधिकारी प्रा. केंद्र.कढोली यांचे उपस्थितीमध्ये वृक्षारोपण सोहळा पार पडला यानिमित्ताने आवारातील बगीच्या मध्ये वृक्षारोपण करण्यात आले.

       सदरचे कार्यक्रमाला सरपंच श्रीमती मीनाक्षीताई वट्टी ग्रामपंचायत सोनसरी डॉ.मधु धारणे वैद्यकीय अधिकारी आयुष्यमान आरोग्य मंदिर सोनसरी , डॉ. पुरुषोत्तम खजरे सर समुदाय आरोग्य अधिकारी , डॉक्टर काटवे पशुधन विकास अधिकारी, श्रीमती सुमित्रा वालदे पोलीस पाटील सोनसरी, प्रमुख पाहुणे श्री रामटेकेजी वार्ताहर, उपस्थित होते.

      कार्यक्रमाच्या यशस्वी ते साठी श्री बागडे आरोग्य सेवक, श्रीमती विहीरघरे आरोग्य सेविका,श्रीमती जाधव आरोग्य सेविका ,श्रीमती झोळे योग प्रशिक्षक ,तसेच श्री लठ्ठे परिचर यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन श्री आर .आर. ठलाल औषध निर्माण अधिकारी यांनी केले…