शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
कंत्राटदाराच्या कामांच्या बिलातून कपात करण्यात आलेला टिडीएस व इन्कम टॅक्स प्रत्यक्ष भरला जात नसल्याबाबत लेखी तक्रार संघटनेचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष इंजी.जगदीश लवाडीया यांनी चंद्रपूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना केली आहे.
ग्रामपंचायत विभागामार्फत विविध विकासकामांसाठी कंत्राटदारांकडून कामे करण्यात येतात.त्या अनुषंगाने संबंधित कंत्राटदाराच्या बिलातून TDS (Tax Deducted at Source) तसेच Income Tax बाबत नियमानुसार कपात केली जाते.मात्र,सदर कपात केलेली रक्कम प्रत्यक्षात सरकारकडे भरली जात नसल्याचे वास्तव लेखी तक्रारी द्वारे इंजी.जगदीश लवाडीया पुढे आणले आहे.
त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे की ही बाब अत्यंत गंभीर असून,यामुळे शासनाच्या महसुलावर परिणाम होतो आणि कंत्राटदारांच्या आर्थिक व्यवहारातही पारदर्शकता राहत नाही.
भविष्यात यामध्ये कोणतेही आर्थिक गैरप्रकार होऊ नयेत यासाठी आपण सदर प्रकरणाची चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करावी,तसेच संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत योग्य त्या सूचनाही द्याव्यात,अशी नम्र विनंती त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना केली आहे.
तद्वतच त्यांनी त्वरित कार्यवाही बाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून अपेक्षा व्यक्त आहे.


