आळंदीतील ११०० महिलांसाठी ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाचे मोफत आयोजन..

दिनेश कुऱ्हाडे 

उपसंपादक

आळंदी : विश्व हिंदू परिषद आळंदी प्रखंड यांच्या वतीने पिंपरी येथील विशाल चित्रपटगृहात फक्त आळंदी येथील महिलांकरिता ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचे ११०० महिलांसाठी मोफत आयोजन करण्यात आले होते. महिलांनी चित्रपट पाहून आनंद व्यक्त करीत आयोजकाचे आभार मानले व अशा पद्धतीने प्रबोधन कायम करीत रहावे असे सूचित केले. हा चित्रपट पाहिल्यानंतर महिलांनी लव्ह जिहाद सारख्या प्रकारांना बळी पडणार नसल्याची शपथ घेतली.

       यावेळी विश्व हिंदू परिषदेचे गणेश गरुड, भाजपचे शहराध्यक्ष किरण येळवंडे, माजी नगरसेवक दिनेश घुले, पांडुरंग वहीले, सचिन मेथे, माऊली बनसोडे, सुरेश लोखंडे, बंडुनाना काळे, मयुरी घुले, संगिता पफाळ, मंगल हुंडारे उपस्थित होते.

        सदर प्रसंगी बोलताना हिंदू धर्मातील तरुणी व महिलांना हा चित्रपट पाहून योग्य ते प्रबोधन होईल, या उद्देशाने मोफत चित्रपट दाखविण्यात आला आहे. असे मनोगत गणेश गरुड यांनी केले.