गोविंदपूर येथे आयोजीत शासन आपल्या दारी उपक्रमात 9212 नागरिकांनी घेतला योजना व सेवांचा लाभ.

डॉ.जगदीश वेन्नम

   संपादक

गडचिरोली,(जिमाका)दि.20: शासनाच्या जनकल्याणकारी योजना नागरिकांच्या दारी हा हेतु समोर ठेवून शासन आपल्या दारी व महाराजस्व अभियान गडचिरोली तालुक्यामध्ये गोविंदपूर येथे 19 मे रोजी आयोजन करण्यात आले होते. गोविंदपूर येथील अभियानाची तयारी म्हणून दिनांक 01 एप्रिल पासून नागरिकांकडून अर्ज भरुन घेण्यात आले होते. नागरिकांनी सीएससी केंद्रामार्फत शासनाच्या विविध योजना व सेवांमध्ये 85 जातीचे प्रमाणपत्र, 821 उत्पन्नाचे दाखले, 61 वय व अधिवास, 11 नॉनक्रिमीलीअर, 1631 शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र, 08 संजय गांधी योजना, 22 श्रावणबाळ योजना, 941 नवीन व दुय्यम रेशन कार्ड, 800 जॉब कार्ड, पीएम किसान योजनेचे 156 नवीन व दुरुस्ती करुन लाभ देण्यात आले, 04 नागरिकांना अधिकार अभिलेख देण्यात आले, 17 मतदार नोंदणी व दुरुस्ती करण्यात आले, कामगार विभागाने 10 नागरिकांना कामगार कार्ड वाटप केले, आरोग्य विभागाने 213 नागरिकांची आरोग्य तपासणी केली.

        आयुष्यमान कार्ड 1773 बनवून नागरिकांना वाटप करण्यात आले. केंद्र शासन पुरस्कृत बँकामार्फत राबविण्यात येणारे सामाजिक सुरक्षा योजना मध्ये पीएम सुरक्षा योजना चे 16 व पीएम जीवन ज्योती योजनाचे 18 अर्ज नागरिकाकडून भरुन घेण्यात आले व सदरच्या सर्व नागरिकांना योजनेचा लाभ देण्यात आला. तसेच येवली मंडळातील सर्व ग्रामपंचायती मार्फत विविध 74 दाखल्याचे वितरण करण्यात आले, 7 नागरिकांना वीज जोडणी महाराष्ट्र विद्युत वितरण विभागामार्फत देण्यात आले. तसेच इतर योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात आले. शासन आपल्या दारी व महाराजस्व अभियान अंतर्गत गोविंदपूर येथील अभियानाला एकूण 9212 नागरिकांना लाभ देण्यात आले तसेच विविध योजनांची माहिती व जनजागृती अभियान स्थळी करण्यात आली. शासन आपल्या दारी या कार्यक्रमांचे उदघाटन राहुल मीणा भा.प्र.से यांनी केले व कार्यक्रमाची प्रस्तावना जगदिश बारदेवाड पुरवठा अधिकारी तहसिल कार्यालय, गडचिरोली यांनी केले. कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित नागरिकांना शासनाच्या विविध योजने बाबत मार्गदर्शन राहुल मीणा भा.प्र.से. व डॉ. मैनक घोष भा.प्र.से. सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांनी केले, तसेच नागरिकांना शासकीय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या स्थळी पी. एन. काळे पशुधन विकास अधिकारी पं.स. गडचिरोली, तसेच श्रीमती इटवले मुख्याध्यापिका शिवानी आश्रम शाळा गोविंदपूर, श्रीमती सरिता चौधरी सरपंच वाकडी, श्रीमती जयपाला दुधबावरे सरपंच दर्शनिमाल प्रितम गेडाम उप सरपंच येवली तसेच इतर विभागातील तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते. गोविंदपूर येथे आयोजीत शासन आपल्या दारी व महाराजस्व अभियान संजय मीणा जिल्हाधिकारी, गडचिरोली, व डॉ. मैनक घोष सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली महेंद्र गणवीर तहसिलदार गडचिरोली यांनी नियोजन केले व श्रीमती प्रियंका मानकर नायब तहसिलदार (नियमीत), ज्ञानेश्वर ठाकरे नायब तहसिलदार (संगायो), जगदिश बारदेवाड पुरवठा अधिकारी, तसेच येवली मंडळाचे मंडळ अधिकारी श्री. लेनगुरे, तसेच मंडळातील सर्व तलाठी व कोटवार यांच्या सहकार्याने यशस्वीपणे राबविण्यात आला. असे तहसिलदार, गडचिरोली यांनी कळविले आहे.