रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी..
दि. २० एप्रिल २०२५
चामोर्शी:-भारतीय जनता पक्षाच्या चामोर्शी तालुक्यातील चामोर्शी मंडल व घोट मंडलाच्या अध्यक्षपदी रोशनीताई वरघंटे व राकेश सरकार यांची नियुक्ती आज दिं. २० एप्रिल २०२५ रोजी उत्साहात जाहीर करण्यात आली.
या निवडीमुळे संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते आणि पक्षाच्या संघटनात्मक बळकटीचा एक महत्त्वपूर्ण टप्पा पार पडला.
या निवड प्रक्रियेला एक प्रकारचा उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते. भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ.अशोक नेते व आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली ही अधिकृत घोषणा करण्यात आली.चामोर्शी व घोट येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात पक्षाचे प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीतील मार्गदर्शनात उपस्थित कार्यकर्तांना बोलतांना मा.खा.डॉ.अशोक नेते म्हणाले:“भारतीय जनता पार्टी हा भारतातील क्रमांक एकचा पक्ष आहे.
आपण या पक्षाचे सदस्य,कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहात ही अत्यंत गौरवाची व अभिमानाची बाब आहे.भाजपा पक्ष सामान्य कार्यकर्त्यापर्यंत न्याय देण्याचं काम करतोय.
यात चामोर्शी तालुक्यातील चामोर्शी व घोट या मंडलाच्या अध्यक्षपदाची एक चांगली निवडणूक प्रक्रिया पार पडली. पुढे बोलत मा.खा.नेते महणाले चामोर्शीतील स्व. स्वप्निल हा माझा जवळचा सहकारी कार्यकर्ता होता.
तो नेहमीच जनतेच्या संपर्कात राहत असे,आणि जनतेच्या अडचणी मला सतत कळवत असे.स्वप्नील ची सतत मला आजही आठवण येते.वरघंटे परिवार हा आधीपासून राजकारणात सक्रीय होता.आज चामोर्शी मंडल अध्यक्ष पदाची निवड प्रक्रियेत रोशनीताई ची निवडीची घोषणा झाली तर घोट मंडलाच्या अध्यक्षपदी राकेश सरकार ह्यांची निवडीची अधिकृत घोषणा झाली. निवड झालेल्या रोशनीताई वरघंटे व राकेश सरकार यांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि भावी कार्यासाठी शुभेच्छा!” असे व्यक्तव्य मा.खा.डॉ.अशोक नेते यांनी केले.
या निवडीमुळे चामोर्शी तालुका व घोट येथील भाजपा संघटनेला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. नव-नियुक्त अध्यक्षांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी, मिठाई वाटप,पुष्पगुच्छ देऊन व भाजपा दुपट्ट्याने त्यांचा सत्कार व अभिनंदन करण्यात आले.
*****
या प्रसंगी उपस्थित असलेले प्रमुख मान्यवर….
माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोकजी नेते,आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे,निवडणूक प्रक्रिया प्रमुख तथा कि.मो.प्रदेश सचिव रमेशजी भुरसे,जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम,जिल्हा उपाध्यक्ष डॉ.भारत खटी, निवडणूक प्रमुख तथा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिलजी पोहनकर,सहनिवडणूक प्रमुख व जिल्हा उपाध्यक्ष अरुणजी हरडे,
महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा गीताताई हिंगे,भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिल तिडके,नव-निवाचित गडचिरोली तालुकाध्यक्ष दत्तू सुत्रपवार,माजी तालुकाध्यक्ष आनंदजी भांडेकर, सहकार प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष आशिषभाऊ पिपरे,ज्येष्ठ नेते तथा माजी जि.प. सदस्य नामदेवराव सोनटक्के,भाजयुमो जिल्हा महामंत्री मधुकरजी भांडेकर,महिला तालुका अध्यक्ष अनिता रॉय, तालुका महामंत्री विनोद गौरकर, माजी शहराध्यक्ष सोपान नैताम, विलास उईके,जेष्ठ नेते रामेश्वर सेलोकर, माणिकजी कोहळे,सिमा कन्नमवार,रमेश नैताम, आवर्जून उपस्थित होते.
*****
इतर मान्यवर कार्यकर्ते….
सुनीलजी दिक्षित सर, नरेश अल्सावार, संजय खेडेकर, रेवनाथ कुसराम, शेषराव कोहळे, प्रतिमा सरकार, भाविक आभारे, निरज रामानुजवार, वासुदेव चिचघरे तसेच मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



