Home Social रमजान ईदनिमित्य गजानन महाराज संस्थानच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी इप्तार पार्टीचे आयोजन…

रमजान ईदनिमित्य गजानन महाराज संस्थानच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी इप्तार पार्टीचे आयोजन…

युवराज डोंगरे 

  उपसंपादक 

खल्लार :- मुस्लिम बांधवांच्या पवित्र असलेल्या रमजान ईदनिमित्य खल्लार येथिल मुख्य बाजार चॊकात श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने इप्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

          आज (21)सकाळी इदग्यावर नमाज झाल्यावर खल्लार येथिल बाजार चौकातील जामा मस्जिद समोर सर्व मुस्लिम बांधवांसाठी इप्तार पार्टीचे आयोजन श्री गजानन महाराज संस्थानच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले होते.

         यात गावातील सर्व मुस्लिम बांधवांसह हिंदू समाजातील नागरिक, पोलिस स्टेशन, बँक कर्मचारी सहभागी झाले होते. यानिमित्य गावात हिंदू मुस्लिम ऐकतेचे उदाहरण पाहायला मिळाले.