कन्हान येथे सुरु असलेल्या आशा वर्कर्स सेविकांच्या व गट प्रवटकाचा आंदोलनाला शिवसेने(उबाठा)पक्षाचा जाहीर पाठींबा.

    कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी:- पारशिवनी तालुक्यातील कन्हान येथे दिनांक १२ जानेवरी पासुन सुरु असलेल्या गट प्रवटकाचा व आशा स्वयंसेविकांच्या आंदोलनास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षाचे रामटेक विधानसभा प्रमुख श्री. विशाल बरबटे यांनी गट प्रवकाचा व आशा वर्करच्या धरणा स्थळी प्राथमिक आरोग्य केन्द कन्हान येथे भेट देऊन समस्या समजून घेतल्या.

        सरकारने आशा स्वयंसेविकांच्या मागण्यांना दिलेल्या आश्वासनाला सरकारनेच परत पाठ फिरवली असून त्यांच् यावर अतिरिक्त कामाचा भार आला आहे.पगार कमी जास्त काम,ऑनलाईन कामे पण सुविधा नाही अशा अवस्थेत कामे करावे लागत असून 2018 नंतर स्वयंसेवींकांच्या बोनस व पगारात सुद्धा वाढ केली नाही. 

        अशा अनेंक मांगण्यांबाबत शिवसेना पक्षाला आशा वर्कर्सने यावेळी निवेदन दिले. 

शिवसेना (उ बा ठा )पक्षाच्या वतीने रामटेक विधानसभा प्रमुख श्री.विशाल बरबटे यांनी आशा स्वयंसेविकांच्या आंदोलनाला पाठींबा जाहीर केला.

       या वेळी पारशीवनी तालुका प्रमुख श्री.कैलास खंडार,युवासेना जिल्हाप्रमुख श्री.लोकेश बावनकर, कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख श्री.समीर मसराम, पारशीवनी तालुका संघटक श्री.गणेश मस्के, वाहतूक सेना श्री.सावन लोंढे,श्री.सनी पत्रे, जेष्ठ शिवसैनिक श्री.अंबादास खंडारे, श्री.नेवालाल पात्रे,श्री.सतीश लाडे, श्री.अंकुशभाऊ,श्री.किशोर शेंडे, श्री.भुरा पात्रे पदाधिकारी, शिवसैनिक व मोठ्यासंख्येने आशा सेविका मोर्चा स्थळी उपस्थित होते.