प्रभू श्रीराम मंदिराची माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सहकार्यासमवेत केली स्वच्छता.    – हिंदू मुस्लिम ऐक्याचे घडले दर्शन..

 बाळासाहेब सुतार

नीरा नरसिंगपूर प्रतिनिधी

  – उद्या इंदापूरमध्ये 5 वाजता भव्य शोभा यात्रेचे आयोजन.

   – इंदापूर नगरपालिकेच्या प्रांगणात उद्या 1 हजारापेक्षा जास्त महिला साजरा करणार दीपोत्सव.. 

   राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज सहकाऱ्यांसमवेत इंदापूर येथील श्रीराम मंदिराची स्वच्छता केली.तसेच उद्या भारताचा सुवर्ण अक्षरात लिहिण्याचा ऐतिहासिक क्षण असून आपण सर्वांनी प्रभू रामचंद्राच्या प्रतिष्ठापनाचा उत्सव गावातील प्रत्येक मंदिरामध्ये,आपल्या घरामध्ये भक्ती भावाने व आनंदाने साजरा करावा असे आवाहन केले. 

       उद्या दि. 22 जानेवारी रोजी श्रीराम मंदिर येथून शोभायात्रेचे आयोजन केले असून या यात्रेमध्ये सर्व रामभक्तांनी सहभागी व्हावे,इंदापूर नगरपालिकेसमोरील प्रांगणात 1 हजारपेक्षा जास्त महिला दीप उत्सव साजरा करणार आहेत त्यानंतर महाप्रसादाचे नियोजन केले आहे.सर्व नागरिकांनी प्रभू रामचंद्राच्या प्रतिष्ठापन उत्सवामध्ये आनंदाने सहभागी व्हावे असे आवाहन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी बोलताना केले.

   हर्षवर्धन पाटील म्हणाले की ,’ प्रभू श्रीराम मंदिरामध्ये मंदिर स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम घेण्यात आला. अनेक भक्तगण या ठिकाणी उत्साहाने सहभागी झाले. सगळ्या जाती धर्माचे लोक या ठिकाणी उपस्थित राहिले. उद्या ऐतिहासिक आणि सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा उत्सव आहे. प्रभू रामचंद्राची प्रतिष्ठापना अयोध्या या ठिकाणी होणार आहे तो कार्यक्रम 11 ते 1 या वाजता आहे .या मंदिरामध्ये सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे. भजन कीर्तन होईल तसेच प्रभू श्रीरामाची भक्ती भावाने पूजाअर्चा केली जाईल.

        या ठिकाणी मोठ्या स्क्रीनवर आयोध्या येथील कार्यक्रम दाखविण्यात येईल.सायंकाळी 5 वाजता श्रीराम मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात येणार असून ही शोभायात्रा इंदापूर नगरपालिकेपर्यंत असेल.या शोभायात्रेमध्ये सर्व रामभक्त आणि एक ते दीड हजार महिला उस्फुर्त सहभागी होणार आहेत.इंदापूर नगरपालिकासमोर 7 वाजता सर्व महिला दीप उत्सवामध्ये सहभागी होणार आहेत यावेळी आतिषबाजी होणार आहे त्यानंतर प्रत्येकाला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे सर्वांनी मिळून हे नियोजन केले आहे .सर्वांनी आपल्या घरासमोर रांगोळी काढून देवपूजा करून अत्यंत आनंदाने,भक्ती भावाने हा उत्सव आपण साजरा करावा.जगाच्या नकाशात अयोध्या महत्त्वाचं शहर आहे. 

      आयोध्या म्हटलं की भारत, भारत म्हटलं की आयोध्या ही वेगळी ओळख जगामध्ये आहे. प्रभू रामचंद्राचा विचार प्रत्येकाच्या मनामध्ये येतो तो ते संस्कार ,ती नैतिकता, ते अधिष्ठान होय.हे सर्व नव्या पिढी समोर सातत्याने राहावे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.